भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीय

मोठी बातमी : एकनाथ खडसेंचा विधानपरिषदेत पेन ड्राईव्ह बॉम्ब !

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : एकेकाळी राज्याच्या राजकारण पेन ड्राईव्ह बॉम्ब ने खळबळ उडवून दिली होती फडणवीस यांच्यानंतर आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही विधिमंडळात राष्ट्रवादीच्या नेत्या व त्यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातला पेन ड्राईव्ह डेटा जमा केलेला पेन ड्राईव्हमध्ये बॉम्ब खडसेंनी टाकला आहे.

विधिमंडळाच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह (Pen Drive) बॉम्ब टाकला. खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंवरील हल्याबाबत व्हिडिओ ऑडिओ असलेला पेन ड्राईव्ह खडसेंनी दिला आहे. ‘रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला झाला त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, पण आतापर्यंत या प्रकरणाची चौकशी झालेली नाही. तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी ही चौकशी आयपीएस अधिकाऱ्याकडे दिली होती, पण पोलिसांनी आरोपींना सहकार्य केलं,’ ‘आरोपींना तडिपारीच्या नोटीस दिल्या होत्या त्या रद्द करण्यात आल्या. मुख्यमंत्री गुंडांना संरक्षण देत असतील तर पोलीस तपास कसा करणार? महिलेवर हल्ला होतो आणि त्याच आरोपींना संरक्षण दिले जाते, यापेक्षा दुर्दैवं कोणतं? महिलांविषयी वाईट बोलत आहेत हे गुंड, केलेली तक्रार दबाव आणून परत घ्यायला लावली,’ असं म्हणत खडसे यांनी या विषयाची व्हिडिओ आणि ऑडियो क्लिपचा पेन ड्राईव्ह सभागृहात सादर केला

खडसे म्हणाले की, यात तीन जणांच्या विरोधात गंभीर कलमांच्या खाली गुन्हे दाखल करण्यात आले. यात आजवर या तिन्ही जणांवर कारवाई करण्यात आलेली नाही. तत्कालीन सरकारने नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. मात्र त्यांनी चौकशी केली नाही. मात्र, पोलिसांनी आरोपींना संरक्षण दिले. यात छोटू भोई यांच्या विरोधात २००५ पासून अतिशय गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुंडांना राज्याचे मुख्यमंत्री संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यानंतर त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यात महिलांना देण्यात आलेल्या धमक्यांचे ऑडिओ रेकॉर्डींग सादर केले. यात त्यांनी महिलांना धमकावून त्यांना अश्‍लील शिवीगाळ करण्यात येत असून याचे पुरावे आपण सादर करत असल्याचे सांगितले. या प्रकरणी तातडीने या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी खडसेंनी केली.

एकनाथ खडसे यांनी हा पेन ड्राईव्ह दिल्यानंतर विरोधी पक्षाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. अशा गुंडांना मुख्यमंत्री संरक्षण देणार असतील, तर दाद कोणाकडे मागायची. 307 चा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट आहेत. या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे. आजच्या आज याविषयी कारवाई झाली पाहिजे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. दरम्यान उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सरकारने याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले.

एकनाथ खडसे यांच्या या आरोपांनंतर सरकारकडून मंत्री शंभुराज देसाई उत्तर द्यायला उभे राहिले, पण शंभुराज देसाई आणि खडसे यांच्यात खडाजंगी झाली. संबंधित पेन ड्राईव्ह आणि क्लिप सभागृहामार्फत द्यावा, योग्य ती कारवाई केली जाईल, असं शंभुराज देसाई म्हणाले. शंभुराज देसाई यांच्या या उत्तराने एकनाथ खडसे नाराज झाले. आवश्यकता असल्याच चौकशी करू? चौकशी करू असं बोलत नाहीयेत. हा सभागृहावर अन्याय आहे. आम्ही दिलेले पेन ड्राईव्ह खोटे होते, तर उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले एवढे पेन ड्राईव्हपण खोटे होते का? असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. तसंच या प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणीही खडसे यांनी केली. यानंतर पेन ड्राईव्हमध्ये काय आहे त्याची तपासणी करून पुढील कारवाईचे आश्वासन देऊ, असं शंभुराज देसाई म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!