भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

खडसेंचे 17 तासांपासून आंदोलन सुरूच, रात्रभर पोलीस स्टेशनसमोरच झोपले !

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबाबत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आक्रमक झाले आहे. गेल्या १७ तासांपासून एकनाथ खडसे पोलीस स्टेशनला ठिया मांडल्यानंतर शहर पोलीस स्टेशन समोर रस्त्यावर आंदोलन सुरू केले आहे. रस्त्यावरच एकनाथ खडसे यांनी रात्री मुक्काम केला. एकनाथ खडसे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. जो प्रयत्न गुन्हा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेत. गुन्हा दाखल केल्याशिवाय परत जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

लोणी, बटर व तुपावरुन दूध संघाचे वातावरण चांगलेच तापले असून लोणी व बटरच्या विक्रीत एक कोटी १५ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करुन संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार एकनाथ खडसे यांनी गुरुवारी दुपारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात निरीक्षकांच्या दालनात ठिय्या मांडला आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नसल्याने कायदा सुव्यवस्थेवरून विश्वास उडाला असून जोपर्यंत पोलिसांचे कपडे उतरवणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा थेट इशारा एकनाथ खडसे यांनी आता पोलिसांना दिला. खडसेंनी रात्रभर शहर पोलीस स्थानकाच्या बाहेर टेंट टाकून आंदोलन करत असून आज सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील या आंदोलना ठिकाणी भेट देऊन यासंदर्भात सखोल माहिती जाणून घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल होत नसल्याने राजकीय दबावापोटी पोलीस हा गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप खडसेंनी केला शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी रात्री 12 वाजता पोलिसांनी एकनाथ खडसे यांचे निवेदन स्वीकारले आहे. मात्र अद्यापपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनातच पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलीस प्रशासनाचा विरोध केला. तसेच पोलीस स्टेशन बाहेर एकनाथ खडसे यांचे ठिया आंदोलन सुरू असून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!