जळगाव जिल्हयात गारपीट अवकाळी पाऊसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाई मिळावी– खडसेंची विधानपरिषदेत मागणी
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | जळगाव जिल्हयात झालेल्या मार्च एप्रिल मे महिन्यात झालेल्या गारपीट अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी असा तारांकित प्रश्न उपस्थित करत एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत केली आहे.
जळगाव जिल्हयात झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पुर्ण नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्या बाबत आ.एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून नुकसानभरपाई देण्याची तसेच अवकाळी पावसामुळे मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत देण्याची मागणी केली
यावेळी ते म्हणाले, गेल्या वर्षभरात जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे केळी, मका व कांदापिकांचे विशेषत: केळी पीकाचे अतोनात नुकसान झाले होते. एक वर्षापुर्वी मा. मुख्यमंत्री मुक्ताईनगरला येऊन सांगून गेले होते की, ताबडतोब नुकसानभरपाई देऊ. मात्र अद्यापही पूर्ण पीकांची भरपाई दिली गेली नाही. पंचनामे झालेल्यापैकी किती पिकांची विशेषत: केळी पिकाची रोग व गारपीट अशा दोन ठिकाणी भरपाई मागितली आहे, यातील किती नुकसान भरपाई देणे बाकी आहे व ती कधी दिली जाणार आहे?
त्यांच्या प्रश्नाला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी उत्तर दिले यावेळी ते म्हणाले, राज्यात माहे मार्च, एप्रिल, मे 2023 मध्ये झालेल्या मुसळधार अवकाळी पाऊस, गारपीट,वादळी वारे यामुळे एकूण 3,02,706.07 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे तसेच या कालावधी मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे 95 व्यक्तींचा आणि 946 जनावरांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. जळगाव जिल्हयात झालेल्या नैसर्गिक आपत्ती आणि शेती पिकांच्या नुकसान भरपाई साठी मार्च महिन्यात 2042.61 लक्ष एप्रिल महिन्यात 2665.48 लक्ष मे महिन्यात 4708.09 लक्ष एवढा मदत निधी वितरित झाला आहे काही राहिले असेल तर त्यासाठी मंत्रालयाच्या दालनात विशेष बैठक आयोजित करून राहिलेला विषय मार्गी लावण्याचे त्यांनी सांगितले