भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावमुक्ताईनगरराजकीय

Video: मी पुन्हा येईन, या नादात माझ्यासह पीए व समर्थकांचे फोन टॅप– खडसेंचा फडवीसांवर निशाणा !

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज-प्रतिनिधी : मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, या नादात निवडणूकीच्या दरम्यान माझ्यासह पीए व समर्थकांचे फोन तब्बल ६७ दिवसांपर्यंत टॅप करण्यात आल्याचा म्हणत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत गंभीर आरोप खडसेंनी पुन्हा फडवीसांवर निशाणा साधला आहे.

सध्या फोन टॅपिंगवरून (Phone Tapping) जोरदार आरोप सुरू झाले आहेत. माजी मंत्री खडसे यांनी “मंडे टू मंडे न्युज” शी बोलतांना म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणूक काळात कुलबा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस महाआयुक्त रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून फोन टॅपिंग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ६७ दिवसांच्या कालावधीत माझ्यासह माझे पीए तसेच समर्थक अशोक लाडवंजारी यांच्याशी संबंधीत व्यक्तीचे फोन टॅप करण्यात आले. गेले ४० वर्ष ज्या व्यक्तीने पक्ष वाढविण्यास मेहनत घेतली त्याच व्यक्ती विरोधात कुणाच्या तरी वरिष्ठ मंत्री स्तरावरून अथवा गृहमंत्र्यांकडून सुचना असल्याशिवाय फोन टॅपींग करणे शक्य नाही.

मी पुन्हा येईन, च्या वादात हे फोन टॅप केले गेले असावेत. या संदर्भात मी गृहसचिवांकडे देखील तक्रार दाखल केली आहे. नेमकं फोन टॅप करण्यास सांगणारी व्यक्ती कोण ? किंवा समाजविघातक कृत्य करीत असल्याचे सांगत माझ्या नावात बदल करण्यात येवून हे फोन टॅप करण्यात आले आहे. या संदर्भात पोलीस तपास सुरू असून योग्यवेळी खुलासा होईलच परंतू हे वरिष्ठ गुह खात्याच्या व्यक्तीकडून किंवा व्यक्तीच्या सांगण्यानुसार होणे शक्य नसल्याचे सांगत निचकृत्य व हलकटपणाचा अगदीच कळस असून या संदर्भात पोलीस शोध घेत असून योग्य वेळी खुलासा होईलच, अशी प्रतिक्रीया माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी फोन टॅपींग प्रकरणाविषयी मंडे टू मंडे न्यूजशी बोलतांना दिली आहे.

खडसे आणि फडणवीसांचा संघर्ष महाराष्ट्रला परिचित आहे, आता फोन टॅपिंग प्रकरणावरून हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस सरकराच्या काळात फोन टॅप झाल्याने यावरून भाजवरही गंभीर आरोप होत आहे. तर गृह खातं हे मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांकडेच असल्याने फडणवीसांवरही थेट आरोप होत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!