मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे गटाकडून ‘यांची’ लॉटरी, तर तिघांना डच्चू! शपथ घेणाऱ्यांची यादी पाहा
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातील महायुती सरकार च्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज दुपारच्या नंतर नागपुरातील राजभवनात पार पडणार आहे. मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे
मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांच्या कोट्यातील काही मंत्रिपद रिक्त ठेवू शकतात अशी शक्यता सूत्रांकडून मिळत आहे.
महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे २१, शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादीचे १० मंत्री असणार आहे. त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गटाकडून तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर भरत गोगावले, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, योगेश कदम यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे.
कशी असेल एकनाथ शिंदे यांची टीम
१) उदय सामंत, कोकण
२) शंभुराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र
३) गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र
४) दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र
५) संजय राठोड, विदर्भ
शिंदेचं नवे शिलेदार
१) संजय शिरसाट, मराठवाडा
२) भरतशेठ गोगावले, रायगड
३) प्रकाश अबिटकर, पश्चिम महाराष्ट्र
४) योगेश कदम, कोकण
५) आशिष जैस्वाल, विदर्भ
६) प्रताप सरनाईक, ठाणे
यांचा पत्ता कट –
१) दीपक केसरकर
२) तानाजी सावंत
३) अब्दुल सत्तार