मोठी बातमी : रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुजरातमध्ये गुप्त भेट?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीने राज्यात सगळं राजकारण ढवळून निघालेलं असताना, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री गुजरातमध्ये भेट झाल्याची माहिती मिळते आहे. गुवाहाटीवरुन काल रात्री एकनाथ शिंदे गुजरातमध्ये दाखल झाले होते. तर फडणवीस हेही रात्रीतून इंदोर मार्गे गुजरातमध्ये दाखल झाले व या बैठकीत राज्यातील सत्ता समीकरण बाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- अखेर “तो” नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
- “त्या ” दोघा पोलीस कर्मचाऱ्यांची एलसीबीतून उचलबांगडी
- बलवाडी – खिर्डी या उखडलेल्या रस्त्यामुळे व वाढलेल्या झुडपांमुळे वाढला अपघाताचा धोका
गुजरातमध्ये बडोद्यात ही भेट झाल्याचे सांगण्यात येते आहे. फडणवीस हे काल रात्री कुठेतरी गेल्याचे समोर आले होते मात्र कुठे हे समजले नव्हते. मात्र आता या भेटीचा चर्चा आहे. यावेळी त्यांनी पुढील प्लान रचल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या भेटीबाबत कोणतीही पुष्टी मिळाली नसली तर मिळालेल्या माहितीनुसार याच कारणासाठी दोघे बडोद्याला जाण्याची शक्यता दाट आहे.
देवेंद्र फडणवीस परतीच्यावेळेसही ते आधी इंदूरला आले आणि येथून मुंबईल परतले. महाराष्ट्रातील एअरपोर्ट शिवसेनेच्या ताब्यात असल्या कारणाने फडणवीसांना आपली यात्रा गोपनीय ठेवली आणि इंदूरला येऊन गुजरातला गेले. त्यांच्या या प्रवासादरम्यान दोन्हीही वेळेस कोणी विमानातून उतरलं नाही आणि चढलंदेखील नाही. विमानात केवळ इंधन भरण्यात आलं.