भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

सेनेची मोठी कारवाई… एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून हटवले !

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. अश्यातच शिवसेनेने एकनाथ शिंदेंना गटनेतेपदावरुन हटवलं असून त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. बंड मोडून काढण्यासाठी शिवसेना आता एकनाथ शिंदेंवर दबाव टाकताना दिसत आहे.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला असून शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. नगरविकास मंत्री आणि शिवसेनेतील मोठे नेते एकनाथ शिंदे यांनी तब्बल ३५ आमदारांना सोबत घेवून बंड पुकारले आहे. काल विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर शिंदे यांनी आमदारांसोबत गुजरातमधील सुरत येथील ‘ली मेरेडियन’ हे हॉटेल गाठले आहे. त्यामुळे शिवसेनेसह राजकीय गोटात सध्या मोठी खळबळ उडाली असून ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. 

या संकटातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या कामाला लागले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना ‘वर्षा’ बंगल्यावर येण्याचे आदेश दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीला शिवसेनेचे केवळ १८ आमदारच उपस्थित होते. याशिवाय शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी आपले बंधू अर्जून आबिटकर यांना पाठवून देत आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह सध्या १९ आमदार असल्याचे समोर येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!