भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

जिल्ह्यातील नदी पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत मागणी

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, मुक्ताईनगर आणि एरंडोल तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाचा प्रश्न विधानपरिषदेत चांगलाच गाजला. आ एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित करताना जळगाव जिल्ह्यातील नदी पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली यावेळी ते म्हणाले

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, मुक्ताईनगर तसेच एरंडोल तालुक्यात अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक सुरु
असल्याचे निदर्शनास आले असून जळगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रातून सुमारे ४ हजार ब्रास अवैध
वाळूचा साठा जप्त करण्याची कारवाई दिनांक १६ नोव्हेंबर, २०२५ रोजी वा त्यासुमारास करण्यात आली आहे मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरात पूर्णा नदी पात्रातून मशिनद्वारेbअवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक होत असल्याबाबत लोकप्रतिनिधींनी दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२५, १६ डिसेंबर, २०२५ आणि १९ जानेवारी, २०२६ रोजी मा.महसूल मंत्री, मा.विभागीय आयुक्त, नाशिक,
विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक, जिल्हाधिकारी, जळगांव, पोलीस अधीक्षक, जळगांव आणि
उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे.


जळगाव जिल्ह्यातील अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक सुरु असून ते रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार यांचेसह महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर व ग्रामस्थांवर वाळू माफियांकडून प्राणघातक हल्ले करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे, जळगाव जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून वाळू गटांचे लिलाव झाले नसल्याने तसेच अवैधरित्या वाळू वाहतुकीतून अधिक आर्थिक फायदा होत असल्याने वाळू ठेकेदारांकडून जिल्हा प्रशासनाच्या वाळू ठेक्याच्या लिलावास प्रतिसाद दिला जात नाही. जळगाव जिल्ह्यातील उपरोक्त कारवाई दरम्यान जप्त केलेल्या ‘वाळू साठ्याचा लिलाव करण्यात आला आहे , त्यातून शासनास किती महसूल प्राप्त झाला आहे,


उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून जिल्ह्यात अवैधरित्या वाळू विक्री रोखण्याकरीताnतसेच प्राणघातक हल्ले करणाऱ्या ठेकेदार/वाळू माफिया यांना अटक करून तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहेयाची माहिती द्यावी. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे गंभीर गुन्हा असल्याने, महसूल
कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबत शासनाकडून कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे याची सुद्धा 4माहिती द्यावी तसेच जिल्ह्यातील नदी पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची आग्रही मागणी एकनाथराव खडसे यांनी केली.

यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले यावेळी ते म्हणाले जळगाव तालुक्यातील मौजे धानोरा बु. ता. जळगाव येथील नदीपात्राजवळुन दिनांक १४/११/२०२५ रोजी २३२८ ब्रास वाळूसाठा जप्त करुन लिलाव करण्यात आला आहे. तसेच अमळनेर, मुक्ताईनगर व एरंडोल या तालुक्यात अनुक्रमे २९ ब्रास, ११ ब्रास व ३१७.२७
ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे.लोकप्रतिनिधींनी याबाबत वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे.जळगाव जिल्ह्यात दिनांक ०१/०४/२०२५ ते दिनांक ३१/०१/२०२६ या कालावधीत ८ शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्यावर हल्ले झाले आहेत.

सन २०२३-२४ मध्ये जळगाव जिल्ह्यातील ०४ गाळमिश्रीत वाळूगटांच्या निविदा झाल्या आहेत. तसेच, सन २०२५-२६ मध्ये पर्यावरण अनुमती प्राप्त १४ वाळूगटापैकी १३ वाळूगटांचा यशस्वी लिलाव झालेला आहे. दिनांक १/०१/ २०२४ ते दिनांक १२/०२/२०२६ या कालावधीत एकूण ६८१८.२७ ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला असून जप्त वाळूसाठ्यापैकी ४०३९ ब्रास जप्त वाळूसाठ्याचा लिलाव करण्यात आला असून त्यामधून रुपये ६०,४९,९३३/- एवढा महसूल शासनास प्राप्त झालेला आहे.
वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर व वाहतूक प्रकरणी विविध कायदे/अधिनियम/नियम यान्वये फौजदारी कारवाई करण्याबाबत दिनांक १७/०७/२०२५ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सूचना निर्गमित केल्या असून त्यानुसार क्षेत्रियस्तरावर कार्यवाही करण्यात येते.दिनांक १/०४/२०२५ ते दिनांक ३१/०१/२०२६ या कालावधीत जळगाव जिल्यात ५८१ अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी रुपये ७,५६,७०,०००/- इतका दंड आकारला असून एकूण ४८ गुन्हे दाखल करुन १९ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!