क्राईममहाराष्ट्र

नीचपणाचा कळस : वासनेपुढे वयही दिसत नाही? ३१ वर्षाच्या तरुणाचा ७० वर्षीय वृद्ध महिलेवर चार दिवस अत्याचार करून हत्या

मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात रोजच नवीन नवीन अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. कुठे साडेतीन चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, तर कुठे सहा ,आठ वर्षांच्या अजाण मुलींपासून तर तरुणींवर अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असताना त्यात आता एक नवीनच नीचपणाचा कळस गाठणारी धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातून समोर आली आहे. एका ३१ वर्षीय तरुणाने एका ७० वर्षीय आजीबाई असलेल्या वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. इतकेच नाही तर तिची हत्या करून तिचा मृतदेह घरातच तीन दिवस ठेऊन राखला.

ही घृणास्पद धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील असून लातूरच्या औसा तालुक्यातील भेटा गावातील मन्सूर सादिक होगाडे वय ३१ वर्ष. या आरोपीची आई बाहेरगावी गेली होती. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने ७० वर्षीय भोळसर महिलेला घरी बोलावून तिच्यावर तीन ते चार दिवस बलात्कार केला. व त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर महिलेचा मृतदेह संशयित आरोपीच्या घरातच होता. तीन दिवसांने आरोपीची आई घरी परतली. घरातील एका खोलीतून दुर्गंधी येत असलेली पाहून आई त्या खोलीत गेली असता तिला या महिलेचा मृतेदह आढळून आला.

७० वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिचा खून करण्याचा आला. एवढंच नाही तर ३१ वर्षीय मन्सूर होगाडे या आरोपीने तब्बल चार दिवस मृत महिलेच्या प्रेतावरही बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे. घरात मृतदेह असल्याचं लक्षात आल्यानंतर आईनेच गावामध्ये याची माहिती दिली. घटनास्थळी भादा, औसा आणि लातूर पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. पोलिसांनी आरोपी मन्सूर हेगाडे याला अटक केली असून पुढील कारवाई करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!