भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

फैजपूर येथील तत्कालीन डीवायएसपी डॉ कुणाल सोनवणे यांना “राष्ट्रपती शौर्य पदक” तर चौघांना “विशेष सेवा पदक”

जळगाव,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके देऊन सन्मानित करण्यात आले. यात जळगाव जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे . गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये सेवा केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यातील चार पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.तर फैजपूर येथील तत्कालीन व सध्या चोपडा येथे कार्यरत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ कुणाल शंकर सोनवणे यांना “राष्ट्रपती शौर्य पदक” जाहीर झाले आहे.

विशेष सेवा पदक मिळणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये शनिपेठ पोलीस ठाण्याचे रंगनाथ धारबळे, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे उद्धव डमाळे, पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस मुख्यालयातील सपोनी नीलेश वाघ यांचा समावेश आहे.

चोपडा येथे कार्यरत असलेले व फैजपूर येथे सेवा बजावलेले उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षल ऑपरेशनदरम्यान केलेल्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. डॉ कुणाल सोनवणे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे २०१९ ते २०२१ यादरम्यान नक्षली चकमकींना चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर सोनवणे यांनी फैजपूर येथे काम पाहिले. सध्या ते चोपडा येथे कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वीही केंद्रीय गृह विभागाच्या वतीने अंतर्गत सुरक्षा पदक, खडतर सेवा पदक, पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह असे पुरस्कार मिळाले आहेत.

राज्यातल्या १७ पोलिसांना ‘शौर्य पदक’ प्रदान करण्यात आले. त्यात डॉ. कुणाल शंकर सोनावणे – उप-विभागीय पोलीस अधिकारी याना राष्ट्रपती शौर्य पदक’ तर “पोलिस शौर्य पदक” दीपक रंभाजी आवटे – पोलीस उपनिरीक्षक, कै. धनाजी तानाजी होनमाने – पोलीस उपनिरीक्षक (मरणोत्तर), नागेशकुमार बोंड्यालू मदरबोईना – नाईक पोलीस शिपाई, शकील युसुफ शेख – पोलीस शिपाई, विश्वनाथ सामैय्या पेंदाम – पोलीस शिपाई, विवेक मानकू नरोटे – पोलीस शिपाई, मोरेश्वर नामदेव पोटावी – पोलीस शिपाई, कैलाश चुंगा कुलमेथे – पोलीस शिपाई, कोटला बोटू कोरामी – पोलीस शिपाई, कोरके सन्नी वेलादी – पोलीस शिपाई, महादेव विष्णू वानखेडे – पोलीस शिपाई, अनुज मिलिंद तारे (आयपीएस) -अतिरिक्त पोलीस अधीक्षक, राहुल नामदेवराव देव्हाडे – पोलीस उपनिरीक्षक, विजय दादासो सकपाळ – पोलीस उपनिरीक्षक, महेश बोरू मिच्छा – मुख्य शिपाई, समय्या लिंगय्या आसाम – नाईक पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.

जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर झाले आहे. ३ ऑगस्ट २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या काळात ते जळगावचे पोलिस अधीक्षक होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!