ब्रेकिंग :माजी मंत्री सुरेश दादा जैन यांचा ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा राजीनामा
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
जळगाव विधान सभा मतदार संघावर अनेक वर्ष आमदार म्हणून कार्य केलेले जळगावचे माजी आमदार, माजी मंत्री व काही काळ सोडला तर १० वर्षा पूर्वी जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे सुरेशदादा जैन हे गेल्या दहा वर्षांपासून सक्रीय होते परंतु २०१४ साली त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते राजकारणापासून दूर होते.परंतु तांत्रीक दृष्टीने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात होते.पक्ष सदस्य आहेत. परंतु आज मात्र त्यांनी पक्षाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
सध्या ऐन लोकसभा निवडणुकीचा महत्वाचा काळ असताना ठाकरे शिवसेनेचा राजीनामा दिल्या मुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले असून ते कोणत्या पक्षात जातात,की राजकारणातून संन्यास घेतात या बाबत त्यांनी कुठलीही भूमिका स्पष्ट केली नसून या बाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता लागून राहिली आहे.