भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यराष्ट्रीय

केंद्र सरकारचा औषधी कंपन्यांना झटका, पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, टारिन,कॅफिन अशा १५६ हानिकारक औषधांवर बंदी

नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l केंद्र सरकार ने गुरुवार रोजी १५६ फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन (FDC)
औषधीवर बंदी घातली असून यात एंटीबायोटिक्स, वेदना निवारक आणि मल्टीविटामिन औषधींचा समावेश आहे. ही औषधे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.”ताप, सर्दी, ऍलर्जी आणि वेदनांसाठी, हाई ब्लड ऑन प्रेशर साठी वापरल्या जाणारी ही औषधे बाजारात विकली जाणार नाहीत. असे सरकारने म्हटले आहे. तसेच केंद्रसरकारने
पॅरासिटामॉलवर सुद्धा बंदी घातली आहे.

पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, टारिन आणि कॅफिनच्या मिश्रणावरही केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ट्रामाडोल हे वेदना कमी करणारे औषध आहे. अधिसूचनेनुसार, आरोग्य मंत्रालयाला असे आढळून आले की एफडीसी औषधांचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. सुरक्षित पर्याय उपलब्ध असताना. केंद्राने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती.

मागील वर्षी जून महिन्यातही सरकारने FDC औषधांवर बंदी घालण्यात आली होती.तसेच २०१६ मध्ये ३४४ एफडीसी
चे उत्पादन,विक्री वर बंदी घातली होती मात्र या निर्णयाला औषधी कंपन्यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.

एफडीसी ही अशी औषधे आहेत जी दोन किंवा अधिक औषधे निश्चित प्रमाणात मिसळून तयार केली जातात. सध्या अशा औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यांना कॉकटेल औषधे देखील म्हणतात. पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, टारिन आणि कॅफिनच्या मिश्रणावरही केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ट्रामाडोल हे वेदना कमी करणारे औषध आहे. या बंदी घातलेल्या FDCs मध्ये मेफेनॅमिक ॲसिड+ पॅरासिटामोल इंजेक्शन, सेटीरिझिन एचसीएल+ पॅरासिटामोल+ फेनिलेफ्रीन एचसीएल, लेव्होसेटिरिझिन+ फेनिलेफ्रिन एचसीएल+पॅरासिटामोल, पॅरासिटामोल + क्लोरफेनिरामाइन मॅलेट + फेनिल प्रोपेनोलामाइन आणि कॅमिलोफिन डायहाइड्रोक्लोराइड 25 mg3 + यांचा समावेश आहे. अधिसूचनेत म्हंटले आहे की, एफडिसी या औषधंकडून घोका होण्याचा संभव आहे.त्या मुळे सार्वजनिक हितासाठी आरोग्याच्या दृष्टीने एफडीसी चे विक्री व वितरणासह उत्पादनावरच बंदी घळणे अत्यावश्यक असल्याचं म्हटलं आहे.

सरकार कडून उचललेल्या, घेतलेल्या निर्णयाचा उद्देश नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे कारण हे कॉम्बिनेशन आरोग्याला हानिकारक आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!