विधानसभा निवडणुक बाबत राज ठाकरे यांची मोठी घोषणा…
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचा कार्यकर्ता मेळावा गोरेगाव पुर्व येथे पार पडला. आगामी निवडणुकीत कोणाशी आघाडी नको, कोणाशी युती नको असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केली आहे. आणि विधानसभा निवडणुकीनंतर मनसे हा सत्तेत असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले. आगामी विधानसभेेला ना युती ना आघाडी. आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. मी तुम्हाला सांगतो की निवडणुकांनंतर मनसे सत्तेतला पक्ष असेल, निवडणुकीनंतर आपण सत्तेत असू. या महाराष्ट्राची धुरा एकदा माझ्या हातात द्या. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे, असे आवाहनही यावेळी राज ठाकरे यांनी केले.
एक वेळ सत्ता हातात देऊन पाहा एकही तरुण तरुणी कामाशिवाय राहणार नाही. राज्यात पोलिसांसमोर, लोकांसमोर खून होताहेत.बलात्कार होत आहेत. याला सुसंस्कृत व सभ्य महाराष्ट्र म्हणता येत नाही.आपल्याला सुस्वस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे. सर्वांचे डोळे महाराष्ट्राकडे लागले आहेत.
निवडणुकीत ते वाटेल ते करतील तुम्हाला गोष्टींमध्ये अडकवतील, पैशाचा आव आणतील. निवडणुकीत पैशांचा महापूर येईल. तुम्हाला त्यांना उद्ध्वस्त करायचे आहे. पैसे देतील तर घ्या कारण ते पैसे तुमचेच आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना निवडून द्या. एकदा सत्ता हातात आली की कोणीही कितीही करू दे, महाराष्ट्र कधी झुकणार नाही अदानी येतो विमानतळे, जागा घेतो. माझ्या कोकणात राहणाऱ्यांना मी सांगतो, गुजरातमध्ये शेतीची जमीन विकत घेऊ शकत नाही पण विकायची असेल तर शेतकऱ्यांना विकू शकतात हा कायदा आहे,” असेही राज ठाकरे म्हणाले.