आरोग्यमहाराष्ट्र

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे रुग्णालयात

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून उद्धव ठाकरे हे गिरगाव येथील एच.एन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या हृदयाच्या धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी चाचण्या केल्या. या रिपोर्टमध्ये ब्लॉकेज आढळल्याने उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता उद्धव ठाकरे हे आरोग्य तपासणीसाठी एच.एन रिलायन्स रुग्णालयात रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. याआधी २०१२ साली ठाकरेंवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!