सोमवार रोजी राज्यातील सर्व कृषी उत्पंन बाजार समित्याचा बंद, काय आहे प्रकरण …
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सोमवार रोजी राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यात पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाधिकाऱ्यांचे ऐकून न घेतल्याने याच्या निषेधार्थ सर्व बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय .
पुण्यात बाजार समिती सहकारी संघाच्यावतीने आयोजित परिषदेत गुरुवारी (ता.३) कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बाजार घटकांच्या समस्या न ऐकता काढता पाय घेतला. याच्या निषेधार्थ सोमवारी (ता.७) राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांनी केली.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्यावतीने गुरुवारी (ता.३) राज्यस्तरीय परिषद पुणे येथे बोलवण्यात आली होती. या परिषदेला पणन मंत्री अब्दुल सत्तार देखील उपस्थित होते. यावेळी मंत्री सत्तार यांच्यावर परिषदेमध्ये शेतकऱ्यांनी प्रश्नाचा भडीमार केला. यानंतर बाजार समितीचे प्रश्न न ऐकताच सत्तार यानं अनपेक्षितपणे या परिषदेतून काढता पाय घेतला. यावेळी परिषदेसाठी याठिकाणी सकाळपासून थांबलेल्या बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांचा घोषणा देत निषेध केला. सरकारच्या या वागणूकीविरोधात राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये सोमवारी (ता.७) एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आला.