भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयभुसावळ

केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे व आ.संजय सावकारे नेपाळ मध्ये, स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून अपघातग्रस्तांची केली विचारपूस

भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l नेपाळमध्ये झालेल्या भीषण अपघात स्थळी जाऊन जखमींची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे आणि भुसावळचे आमदार संजय सावकारे हे रात्रीच नेपाळला रवाना झाल्या.त्या आज २४ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये पोहोचून त्यांनी  जखमींची माहिती घेतली

नेपाळ येथे जळगांव जिल्ह्यातील भाविकांच्या झालेल्या अपघात निमित्त आज सकाळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर, काठमांडू येथे पोहचून भारतीय राजदूत श्री. नवीन श्रीवास्तव आणि नेपाळ परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सहसचिव श्री. ब्रिघू ढुंगाना यांच्या सोबत बचाव कार्य आणि पुढील कारवाई बाबत चर्चा. यावेळी भुसावळ येथील आमदार श्री.संजयजी सावकारे सुद्धा सोबत उपस्थित होते. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि आमदार संजय सावकारे यांनी स्थानिक प्रशासनातील उच्च अधिकारी यांची भेट घेऊन जखमी झालेल्यांवर आवश्यक ते वैद्यकीय उपचार करण्याचे सांगितले.

काल नेपाळमधील काठमांडू आणि पोखरा शहराच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला असून यातील २५ जण हे भुसावळ तालुक्यातील वरणगाव तळवेल व परिसरातील गावांचे नागरिक आहेत. काल ही बातमी जळगाव जिल्ह्यात पोहोचतच वरणगाव परिसरासह जिल्ह्यावर शोककळा पसरली. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी फोनवरून, व्हिडिओ कॉल वरून जखमींची विचारपूस करून नंतर तेथील स्थानिक प्रशासनाला आवश्यक ती मदत करण्याची विनंती केली. यानंतर आमदार संजय सावकारे आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे हे दोन्ही मान्यवर रात्रीच्या फ्लाईने तातडीने नेपाळला निघाले.

आज २४ रोजी सकाळी ते नेपाळला पोहोचले असून त्यांनी त्रिभुवन युनिव्हर्सिटी टीचिंग हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. दरम्यान या अपघातात मृत्यू झालेले व्यक्तींचे शव आज सायंकाळपर्यंत त्यांच्या घरी पोहोचणार असून जखमींवर काठमांडू येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे आणि भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी काठमांडू येथे उपचार घेत असलेल्या जळगांव जिल्ह्यातील १६ भारतीय नागरिकांची नेपाळचे गृहमंत्री श्री. रमेश लेखक यांच्या समवेत भेट घेतली. यावेळी शोध आणि बचाव कार्यासाठी तसेच जखमींच्या उपचारासाठी तातडीने आणि वेळेवर मदत केल्याबद्दल माननीय गृहमंत्री आणि नेपाळ सरकारचे आभार मानले. तसेच नेपाळी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी आवश्यक सहाय्य आणि समन्वय प्रदान केल्याबद्दल भारतीय दूतावासाचे सुद्धा कौतुक केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!