नेपाळ बस दुर्घटनेतील मयताच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांच्या मदतीची मुख्यमंत्र्यांची जळगाव मध्ये घोषणा
जळगाव, मंडे टू मंडे न्युजय नेटवर्क l नेपाळ येथील काठमांडू आणि पोखरा शहराच्या दरम्यान देवदर्शनासाठी जात असताना भाविकांची बस मास्यार्गडी नदी पात्रात पडून झालेल्या दुर्दैवी अपघातात जळगावच्या २६ आबालवृद्धांचा मृत्यू झाला. हे सर्व भाविक जळगाव जिल्ह्यातील वरणगाव, तळवेल, दर्यापूर, सुसरी ,भुसावळ येथील असल्याने त्यांचे मृतदेह नेपाळ येथून जळगाव विमानतळावर आणण्यात आले तेथून ते त्यांच्या घरी आणण्यात येऊन मृतांवर भुसावळ, वरणगाव,दर्यापूर, तळवेल, सुसरी, या गावात एकाच वेळी शोकाकुल वातावरणात अंत्य संस्कार करण्यात आलेत.
दरम्यान, या नेपाळ येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबियांसोबत सरकार उभे असून मदतनिधी म्हणून ५ लाख रुपयांची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी रविवारच्या लखपती दीदी संमेलन मेळ्यात दुःख व्यक्त केले
मृत्यू झालेल्या भाविकांच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिनांक २५ ऑगस्ट रोजी लखपती दीदी संमेलन मेळ्यात केली. तर मयतांचे वारस व जखमीना केद्र व राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिले.
आज रविवारी जळगाव विमानतळ परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘लखपती दीदीं’चा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत निधीची घोषणा केली.