राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय, उत्तर महाराष्ट्रासह या भागात पडणार जोरदार पाऊस
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. ता. २० आगष्ट रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे.
आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुबार आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. असा आयएमडी ने अंदाज दर्शविला आहे.
भारतीय हवामान खात्याने आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा. तसेच सांगली जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आलाय.
मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. आज जवळ जवळ राज्यभर पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.