रोटी ते भोटा व भोटा ते कालवड रस्ता डांबरीकरण करण्यासाठी मनविसेनेचे लाॅलीपाॅप आंदोलन! रस्ता न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार!
नांदुरा, जि.बुलढाणा.मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l तालुक्यातील भोटा ते रोटी व भोटा ते कालवड रस्ता डांबरीकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सतत पाठपुरावा केला पण जि.प.ने याची दखल न घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने लाॅलीपाॅप आंदोलन करण्यात आले आहे.
सदर रस्ता डांबरीकरण करण्यात यावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला. या रस्त्या साठी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मलकापूर येथे उपोषण करून सुद्धा या रस्त्याची दखल न घेतल्याने आज दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल भाऊ लोखंडकार व महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे माजी राज्य उपाध्यक्ष श्रीकृष्ण भाऊ सपकाळ , मनसे जिल्हा अध्यक्ष अमित बाप्पू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रोटी ते भोटा व भोटा ते कालवड रस्ता डांबरीकरण करण्यासाठी मनविसे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर व मनविसे जिल्हा सचिव राहुल चोपडे यांच्या नेतृत्वाखाली लाॅलीपाॅप आंदोलन करण्यात आले.
स्वातंत्र्य प्राप्तीपासुन सदर रस्ता डांबरीकरण न झाल्याने गावकऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. तसेच सतत सत्ताधारी व विरोधक निवडणुकीवेळी येथील जनतेला चाॅकलेट देत आले आहेत त्यामुळे मनसेने लाॅलीपाॅप वाटून अनोखे आंदोलन केले.
आंदोलन करतेवेळी भोटा येथील सरपंच कडूभाऊ भोटकर, दादगांव ग्रामपंचायत सरपंच गणेशभाऊ काटे, रोटी सरपंच पती तथा पोलिस पाटील संजयभाऊ उगले, हिंगणा (भोटा) माजी सरपंच सुनील खवले, भाजपाचे भोटा बुथ प्रमुख अजाबराव पारस्कर, भाजपाचे विकास घुळे, माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल डिगांबर पारस्कर, पंकज खवले, पुरुषोत्तम चांदुरकर, योगेश राठी, अविनाश पारस्कर, सचिन पारस्कर, गजानन पारस्कर, शुभम पारस्कर, शिवशंकर देवकर, महादेव पारस्कर, निलेश चांदुरकर, विलास घुळे, निवृत्ती पारस्कर, विनायक पारस्कर, मोहन हरकुट, लालाभाऊ राठी, महेश राठी, किसनराव साटोटे, मोहन पारस्कर,राम पारस्कर, गणेश घुळे, शिवाजी पारस्कर, अनिल कुवारे, सदाशिव पारस्कर,रामकृष्णा घुळे, गजानन खवले, रामकृष्ण मानकर यासह भोटा,रोटी, हिंगणा भोटा येथील गावकरी हजर होते. यावेळी मनसेने रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्यांना लाॅलीपाॅप देऊन मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.