तिरुपती बालाजीचा प्रसाद पुन्हा चर्चेत, प्रसादात सापडले किडे
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l तिरुपती बालाजीचा प्रसाद पुन्हा चर्चेत आला आहे. प्रसादाचा वाद शांत होत नाही तोच आणखी एक वाद सुरू झाला आहे. आधीच तिरुपती मंदिरातील प्रसादाचा वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाही. प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असलेले तूप वापरल्याबाबतचा वाद अद्याप संपलेला नसताना एका भक्ताने प्रसादात किडे सापडल्याचा दावा केला आहे.
दुपारच्या जेवणाच्या प्रसादात किडे आढळून आल्याचे भक्ताने आरोप केले. मात्र, मंदिराच्या प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
चंदू नामक भक्त वारंगलचे रहिवासी भक्त चंदू यांनी सांगितले की, बुधवारी प्रसाद घेण्यासाठी ते दुपारच्या जेवायला गेले होते. त्यावेळी त्यांना प्रसादात किडे आढळले. ही घटना बुधवारी घडली. त्यांनी सांगितले की, दही भातामध्ये किडे होते. मात्र, मंदिर प्रशासनाने अशी कोणतीही घटना घडल्याचा इन्कार केला आहे. तिरुपती देवस्थान ने दाव्यांना निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, दररोज हजारो भक्त येथे दर्शनासाठी आणि प्रसादासाठी येतात. भक्तासांठी ताजं जेवण केलं जात. हा बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु या घटनेने तिरुपती बालाजीच्या प्रसादाचा मुद्दा पुन्हा वादग्रस्त ठरत आहे.