भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

उपजिल्हाधिकाऱ्याला ५० हजार रुपयाची लाच घेताना अटक, घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l एका जमीन प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर हे ५० हजार रुपयाची लाच घेताना सापडल्याने त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

पालघर येथून संजीव जाधवर यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यातून राजापूर येथे झाली होती. मात्र बदली झालेली असतानाही त्यांनी पदभार सोडला नव्हता. ते एक वर्ष वाढवून मिळावे ह्यासाठी ते प्रयत्नशील होते. आणि त्यातच तक्रारदार हे पालघर तालुक्यातील वाडा येथील एक आदिवासी खातेदार असून त्यांची जमीन नावावर करण्यासाठी त्यांनी आपले प्रकरण मंजूर करण्यासाठी गेले असता सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदाराकडे ५० हजाराची लाच मागितली होती.

तक्रारदार यांनी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद पूर्ण केल्यानंतर संजीव जाधवर आपल्या कार्यालयात आले. त्यानंतर तक्रारदारानी त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच ५० हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी खळबळ उडाली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!