बनावट कागदपत्रे तयार करून वृद्धाची १९ लाखांची फसवणूक
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एका ६५ वर्षीय वृद्धाला बँकेचे व्यवहार घरपोच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देण्याचे आमिष दाखवत तसेच बनावट कागदपत्रे तयार करून देऊन तब्बल १९ लाख ४०५ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरातून उघडकीस आली.
अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील तापी नगर मधील प्रदीपसिंह प्रतापसिंह परदेशी, वय-६५ वर्ष, रा. तापी नगर, भुसावळ. हे सेवानिवृत्त वृद्ध याना दि. १० मार्च ते ६ डिसेंबर २३ च्या दरम्यानच्या काळात जळगाव येथे राहणारे संदीप चौधरी व सोनाली चौधरी यांनी प्रदीपसिंह परदेशी यांना बँकेचे व्यवहार घरपोच करून देऊन चांगले रिटर्न मिळवून देऊ असे सांगून विश्वास संपादन करून त्यांच्याकडून कॅश, ऑनलाईन व चेकद्वारे तब्बल १९ लाख ४०५ रुपये स्वीकारून त्याच्या मोबदल्यात बनावट व हुबेहूब दिसणारे कागदपत्र तयार केले.अशी त्यांची रक्कम हडप केली.
दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रदीपसिंह परदेशी यांनी २५ नोव्हेंबर सोमवार रोजी दुपारी २ वाजता भुसावळ शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार आरोपी संदीप चौधरी व सोनाली चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय विजय गायकवाड हे करीत आहे.