भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग; महाराष्ट्रातील लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर भाजपा ठाम, संभाव्य उमेदवारांची यादी, धक्कातंत्राचा वापर!

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभा निवडणुकांचे पडधाम वाजायला सुरुवात झाली असून ,कधीही लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, अशातच महायुतीच्या जागावाटपावर अद्याप शिक्कामोतर्ब झालेले नाही. भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम आहे. मात्र भाजपा या 32 जागा लढवत असताना काही जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट आग्रही असल्याच पाहायला मिळत आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा केंद्रीय मंत्री अमित शहा सोडवणार आहेत.

महायुतीमधील घटकपक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात असून कोणत्याही क्षणी महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी भाजपच्या महाराष्ट्रातील संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी समोर आली आहे. उमेदवारांची निवड करताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने आपल्या लौकिकाप्रमाणे धक्कातंत्राचा पुरेपूर वापर केल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपने (BJP) अपेक्षित चेहरे बाजूला सारुन नव्या नेत्यांना संधी दिली आहे. 

अशी असु शकते भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी

  1. पुणे : मुरलीधर मोहोळ.
  2. धुळे : सुभाष भांबरे यांच्या ऐवजी प्रदिप दिघावरकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता.
  3. नांदेड – प्रतापराव चिखलीकर यांच्या जागी मिनल खतगावकर ( अशोक चव्हाण यांची भाची. काल सकाळी अमित शहा यांची भेट घेतलेली ) उमेदवारी पुन्हा देण्याची शक्यता.
  4. जालना : रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता.
  5. चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवल जाण्याची शक्यता.
  6. नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवले जाणार.
  7. नंदूरबार : हिना गावित किंवा विजयकुमार गावीत.
  8. अकोला : संजय धोत्रे
  9. ईशान्य मुंबई : मनोज कोटक
  10. सोलापूर : सिद्धेवर महाराज यांच्या ऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता.
  11. कोल्हापूर : सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे.
  12. भंडारा-गोंदिया : सुनिल मेंढे
  13. बीड : विद्यामन प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे.
  14. माढा – रणजितसिंह निंबाळकर
  15. गडचिरोली : अशोक नेते यांच्या ऐवजी राष्ट्रवादी चे मंत्री धर्मराव बाबा अत्राम भाजपा चिन्हावर लढू शकतात.
  16. भिवंडी : कपिल पाटील
  17. सांगली : संजयकाका पाटील यांच्या ऐवजी कॉग्रेस चे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून लढू शकता.
  18. सातारा : उदयनराजे भोसले
  19. जळगाव : उन्मेष पाटील किंवा ए टी नाना पाटील.
  20. दिंडोरी : भारती पवार
  21. रावेर : अमोल जावळे/रक्षा खडसे
  22. उस्मानाबाद : बसवराज पाटील (नुकताच बसवराज पाटील यांनी भाजपा पक्ष प्रवेश केलाय)
  23. उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मिळण्याची शक्यता.
  24. संभाजीनगर : विद्यामन मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड.

25: उत्तर मध्य मुंबई : पुनम महाजन यांच्या ऐवजी आशिष शेलार यांना मिळण्याची शक्यता.

  1. ठाणे : डॉ.संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता. (ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा घेण्यास आग्रही आहे )
  2. रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे.( रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये अजूनही वाद सुरू आहे शिंदे गटाकडून किरण सामांत लढण्यास इच्छुक आहेत )
  3. दक्षिण मुंबई : राहूल नार्वेकर ( दक्षिण मध्यदक्षिण मध्य मुंबईचे काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश देऊन राज्यसभा दिली )
  4. पालघर : सध्या राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत मात्र ते भाजपा पक्ष प्रवेश करून भाजपा तिकिटावर लढतील अशी शक्यता आहे.
  5. अहमदनगर : सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे.सध्या नगरमध्ये वाद सुरू आहे.
  6. अमरावती : नवनीत राणा यांचा भाजपा पक्ष प्रवेश होईल.मात्र नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत.या जागेवर आनंदराव अडसूळ हे देखील आग्रही आहेत.

    32. हिंगोली : हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजपा       आग्रही असून त्याठिकाणी भाजपा तानाजी मुरकुटे यांना मिळण्याची शक्यता.

अमित शहांनी मुंबईत महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या बैठकीला शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. बैठकीत व्यवहार्य तोडगा काढा, हट्ट नको, असा सल्ला अमित शहा यांनी भाजपसह महायुतीमधील इतर पक्षांना दिला.

त्याचबरोबर भाजप लोकसभेत ३० जागांवर निवडणूक लढवणार असून शिंदे गटाला १२ जागा, तर अजित पवार गटाला ६ जागा मिळतील, असं अमित शहा यांनी महायुतीतील नेत्यांना सांगितलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ४०० चे टार्गेट घेऊन कामाला लागा, असा सल्लाही अमित शहा यांनी दिल्याची माहिती आहे.

दुसरी यादी ७ मार्च रोजी

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. परंतु महाराष्ट्रातील जागा वाटप न झाल्यामुळे त्यामध्ये महाराष्ट्रातील एकाही मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यानंतर जागा वाटपाचा तिढा अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर सुटल्याचे समजते. यामुळे येत्या 7 मार्चला भाजपकडून दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या यादीत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ आणि उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!