भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नगरपालिकामहाराष्ट्रराजकीय

Breaking : महापालिका व नगरपालिका निवडणुक बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसारच होणार !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई, प्रतिनिधी : ठाकरे सरकारनं निवडणुकांसंदर्भात मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असेल. गेल्या काही काळापासून वॉर्ड तसच प्रभाग पद्धतीवर मोठं राजकारण सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याने आगामी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

प्रस्ताव हा चार सदस्यीय प्रभागाचा होता. पण मंत्रिमंडळातील काही नेत्यांचं म्हणणं होतं की 3 सदस्यीय प्रभागच योग्य ठरेल. त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 3 सदस्यी प्रभाग निश्चित केला. नगरपरिषद आणि नगरपालिकेत 2, तर नगर पंचायतीमध्ये 1 प्रभाग पद्धत असेल. यामुळे त्या भागातील नागरिकांना नागरी सुविधा देणं सोयीचं ठरेल, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय महाविकास आघाडीने एकमताने घेतला आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. गेल्या वेळी राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला होता. तर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला.

राज्य शासनाने या संदर्भात ३१ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २०१९ अन्वये सर्व महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पध्दती लागू केली होती. अलीकडेच याबाबतचा शासन निर्णय देखील जाहीर झाला होता. निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या निवडणुका वेळेत घ्यावयाच्या असल्यास नवीन पध्दतीत प्रभाग रचनेसाठी वेळ लागेल. यामुळे ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने आधीप्रमाणेच बहुसदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. याच्या अंतर्गत महापालिकेत तीन तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्यीय प्रभाग पध्दती असणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!