भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमहाराष्ट्रराजकीय

नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूका पुन्हा लांबणीवर, ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गेल्या चार ते पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यात नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या , नगरपंचायती यांचा समावेश आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी होती. परंतु आजच्या सुनावणीत पुढची तारीख दिल्याने पालिका, महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडलेल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह अनेक महापालिका तसेच राज्यातील अनेक जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे जवळपास तीन ते पाच वर्षांपासून तिथे प्रशासक राज आहे. सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीत पुढची तारीख मिळत असल्याने सुनावणी लांबणीवर ढकलत असल्याने निवडणुकही लांबणीवर पडत आहेत.

पुढची सुनावणी २५ फेब्रुवारीला
ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी आजही झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयात २५ फेब्रुवारीला पुढील सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे पालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडलेल्या आहेत.

राज्यातील ९२ नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं की नाही याचा निर्णय पुढील सुनावणीत निकाली लागेल. त्यानंतर मात्र प्रशासक राज बाजूला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!