४०० रुपयांची लाच, वीज मंडळाच्या कर्मचाऱ्याला अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बांधकाम सुरू असलेल्या घराच्या विजेची वायर दुसऱ्या खांबावर जोडून दिल्याचे मोबदल्यात ४०० रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र वसंत धोबी, वय- ३३ वर्ष, व्यवसाय- वरिष्ठ तंत्रज्ञ, याला रंगेहाथ पकडण्यात आले.
तक्रारदार यांच्या घराचे बांधकाम सुरू असून त्यांच्या घराच्या वीज पुरवठ्याच्या वायरचा अडथळा होत असल्याने वीज तंत्रज्ञ जितेंद्र धोबी, यांनी तक्रारदार यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घराच्या विजेची वायर दुसऱ्या खांबावर जोडून दिल्याचे मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे ५५० /- लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी दि.०९.०१.२०२५ रोजी तक्रार दिली होती सदर तक्रारीची दि.०९.०१.२०२५ रोजी जितेंद्र धोबी यांनी तक्रारदार यांच्याशी चर्चा करून तडजोडी अंती ४०० रुपये लाचेची मागणी करून दि. १०.०१.२०२५ रोजी जितेंद्र धोबी यांनी विजेची वायर दुसऱ्या खांबावर जोडून दिलेचे मोबदल्यात तक्रारदार यांचे कडून ४००/- रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारल्याने
जितेंद्र वसंत धोबी, वय- ३३ वर्ष, व्यवसाय- वरिष्ठ तंत्रज्ञ, म.रा.वि.वि. कंपनी मर्या. उपविभाग शिरपूर, ता. शिरपूर, जि. धुळे. राह- प्लॉट नं१४., महाराजा अग्रसेन नगर, ८० फुटी रोड, वरवाडे, शिरपूर जि. धुळे. रा.- लोहटार, ता. पाचोरा, जि. जळगाव. याना रंगेहात पकडण्यात आले आहे असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई – परिवेक्षण अधिकारी सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक लाचलुतपत प्रतिबंधक विभाग धुळे मो. सापळा अधिकारी- रूपाली खांडवी,पो. निरी. ला.प्र. विभाग, धुळे. पो. हवा. कदम, पो. कॉ. मकरंद पाटील, पो. कॉ. प्रवीण पाटील, सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट .