भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे अवैध गौण खनिजांची चोरी, प्रशासन घेतेय झोपेचे सोंग..

ऐनपुर, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज, विजय के अवसरमल l रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे बरेच दिवसा पासुन अवैध गौण खनिजची डंपर व ट्रॅक्टर द्वारे चोरटीवगौण खनिज उत्खनन करून वाहतूक करून लूट केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे की ऐनपुर ग्रामपंचायत च्या मालकीची सुलवाडी रोड वरील भगवती मंदिर परिसरात गट क्रमांक ४४४ व ४५० हा भुखंड मोठमोठ्या बरड्या असून या बरड्यांचे बऱ्याच दिवसांपासून उत्खनन सुरू आहे. काहींना हाताशी धरून कोणाच्या आशिर्वादाने मुजोरी करून मोठमोठे डंपर व ट्रॅक्टर द्वारे बाहेर गावी वाहतूक करीत आहेत ग्रामपंचायत ची कुठलीही परवानगी न घेता सर्रासपणे दादागिरीने कुणालाही न जुमानता वाहतूक करीत आहेत. ऐनपुर हद्दीतील टेकडया माफीयानी साफ केल्या असून दिवस रात्र गौण खनिजची उपलब्ध व वाहतूक बेसमार पध्दतीने सुरू आहे.

ऐनपुर येथे मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालय असून यांना सुध्दा ही होणारी अवैध गौण खनिज वाहतूक करणारे डंपर व ट्रॅक्टर कधी दिसले नाहीत का? का यांचे काही आर्थिक संबंध तर नाही ना? अशी चर्चा गावकऱ्यामध्ये सुरू आहे. ग्रामपंचायत चे सरपंच व सदस्य यांनी अवैध गौण खनिज वाहतूकीकडे दुर्लक्ष केलेले दिसत आहे उत्खनन करण्यात येणाऱ्या गौण खनिजांचा कुठलाही महसूल ग्रामपंचायत कार्यालयाला मिळत नाही मग कोणाच्या परवानगीने हे उत्खनन सुरू आहे. याला कोणाचा आशिर्वाद आहे मंडळ अधिकारी,तलाठी,नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्याकडे तोंडी तक्रार केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. तात्काळ अवैध गौण खनिज वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!