भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

निराधार आश्रमात देहविक्री, गतीमंद मुलींकडून करून घेतली जाते मालिश

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात चिमुकल्या मुलींना वासनेची शिकार केलं जात आहे. ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आला,अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील शिक्षकाने शाळेतीलच सहा विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला, त्याच प्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे नराधमाने चीमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली, त्यातच बदलापूर मध्ये साडे तीन वर्षाची व एक सहा वर्षीय अशा दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार या घटना ताज्या असताना आता अशीच एक धक्कादायक घटना साताऱ्यातील कराड मधून उघडकीस आली.

कराडच्या टेंभू येथील आश्रमात जबरदस्तीने देहविक्रीचा व्यवसाय सुरू असून या महिला निराधार आश्रमात अनाथ मुली आणि महिलांना मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप एका पीडित महिले कडून करण्यात आला असून पीडित महिलेच्या तक्रारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनाथ मुली आणि महिलांना या आश्रमात आश्रय दिला जातो.
या आश्रम शाळेच्या संचालिका गतीमंद मुलांकडून मालिश करुन घेत असल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात या आश्रमामध्ये गतीमंद मुलीकडून आश्रम चालक महिला पायाला मॉलिश करून घेतानाचा आणि मारहाण करतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. एवढेच नव्हे तर आश्रम चालक महिलेच्या स्वयंपाक घरामध्ये चक्क दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलंय. यात एक मुलगी पाण्याच्या हंड्यातून दारूच्या बॉटल घेऊन त्या बरणीमध्ये ठेवत असल्याचं दिसत आहे.

या प्रकरणी कराड पोलिसांनी ‘आई चॅरिटेबल ट्रस्ट निराधार आश्रमा’च्या संचालिका आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

इथल्या एक महिला अनाथ आश्रमाच्या नावावर महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याच्या तक्रारी कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी पोलीस पथकासह टेंभू गावात छापा टाकला. अनाथ आश्रमाची पाहणी केली असता त्यठिकाणी एक वृद्ध महिला आणि तिची 21 वर्षाची गतीमंद मुलगी राहत असल्याचं आढळून आलं. गतीमंद मुलीची वैद्यकीय तपासणी करुन पोलिसांनी तिला आशाकिरण वसतिगृहात पाठवलं. अनाथ आश्रमात आणखी कोणी महिला, मुली येतात का, याची माहिती पोलीस घेत आहेत.

पीडितेच्या तक्रारीवरुन कराड ग्रामीण पोलिसांनी अनाथ आश्रम चालक महिलेसह वाल्मीक महादेव माने (रा. म्हासोली, ता. कराड) या दोघांच्या विरुद्ध पिटांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. न्यायालयानं त्यांना 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

अभिनेता किरण माने यांचा दावा
याबाबत अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या दाव्यात म्हटले आहे की, कराड जवळ निराधार मुलींसाठी असलेल्या एका आश्रमात सेक्स स्कँडल सुरू असल्याचा दावा केला असून इतकेच नव्हे तर
यात राजकारणी, समाजसेविका, आणि पोलीस सुद्धा सामील असल्याचं म्हटलं आहे. तसेच निराधार मुलींसाठी असलेल्या आश्रमात चालणारा लैंगिक शोषणाचा हा प्रकार भयानक असल्याचं किरण माने म्हणाले.या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!