भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ सहायक निहाल तडवी यांनी वारंवार कामात व कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून एरंडोल पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय अहिरे यांनी निहाल तडवी यांचेवर निलंबनाची कारवाई केली आहे.

वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे, कार्यालयीन कामकाजात दिरंगाई करणे, सतत गैरहजर राहणे आदी कारणावरून एरंडोल पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ सहायक निहाल तडवी यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!