भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

चाळीसगाव

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला चार सख्ख्या भाऊ – बहिणींचा धरणात बुडून मृत्यू

चाळीसगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाच्या परिसरातील केटी वेअर धरण परिसरात खेळायला गेलेल्या चार सख्ख्या तीन बहिणी व एक भाऊंचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दि १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान घडली.

चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात आदिवासी समाजाचा आर्य परिवार येथील उदय सुधाकर अहिरे यांच्याकडे गेल्या दीड वर्षांपासून शेतात कामाला आहे. त्यांच्या या परिवारात सुभाष सिंह आर्य,त्यांची पत्नी , ५ मुली, १ मुलगा असून परिवारातील मोठी मुलगी संजना ही भांडी घासण्यासाठी के. टी. वेअर धरणाच्या काठावर गेली होती. बहिणी सोबत रोशनी सुभाषसिंग आर्य (वय ९ वर्ष), शिवांजली सुभाषसिंग आर्य (वय ८ वर्ष), आर्यन सुभाषसिंग आर्य (वय ३ वर्ष) आराध्या सुभाषसिंग आर्य (वय ४ वर्ष, सर्व रा. दुगणी तहसील ता. सेंधवा जिल्हा बडवणी) ही चार मुले रविवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास सोबत गेली.तर दीड वर्षांची परी हि घरी होती.

होत्याचे झाले नव्हते..
धरणाच्या पाण्याजवळ गेले असताना त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडाले. चारही सख्खे बहीणभाऊ क्षणार्धात एकमेकांसोबत बुडाले. होत्याचे नव्हते झाले. ग्रामस्थांना समजताच त्यांनी धावाधाव केली. दरम्यान पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी इम्रान खान,राजू नाईक,किरण सोनावणे या पोहणाऱ्यांनी त्यांस मदत केली. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला या बाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर स्टेशनचे प्रभारी निरीक्षक संदीप पाटील हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.

पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. मंदार करंबळेकर यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. यावेळी पावरा परिवाराचा मन हेलावणारा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे पावरा कुटुंबावर मोठा आघात कोसळला आहे. घटनेबद्दल चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री उशिरा नोंद करण्याचे काम सुरु होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!