भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

वनक्षेत्र हद्दीत अपप्रवेश भोवला; वनविभागाकडुन जेसीबी जप्त

सुकळी, ता. मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनक्षेत्र तथा ‘मूक्ताई-भवानी अभयारण्या’र्तगत येणाऱ्या डोलारखेडा वनपरीमंडळातील पिंप्रीपंचम नियतक्षेत्रात प्रवेश निषिद्ध वनक्षेत्रात अपप्रवेश प्रकरणी जेसीबी मशीन वर कारवाई करण्यात आल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर तालुक्यात वडोदा वनक्षेत्रात दि ७ मे रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास वनाधिकारी गस्त करीत असतांना,पिंप्रीपंचम वनहद्दीत कं.नं. ५९०क मध्ये जेसीबी क्र एम एच १९ डि व्ही ९०३१ आढळुन आले. सदर जेसीबी पुढील कारवाई साठी ताब्यात घेत मालक चेतन पदनामे याच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ च्या विविध कलमांर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

सदर कारवाई उपवनसरंक्षक प्रविण ऐ,साहाय्यक उपवनसरंक्षक उमेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी परीमल साळुंखे यांच्यासह वनरक्षक दिपाली बेलदार,ए एस मोरे, रजनीकांत चव्हाण वनमजुर योगेश कोळी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

वेगवेगळ्या दिशार्तगत तपास करण्याचे वनविभागा पुढे आव्हान.
पट्टेदार वाघांसह इतर पशु-पक्षांची विपुल संख्या व वनसंपदेने नटलेल्या जंगलाचे स्वरुप राखिव वनसंवर्धन क्षेत्र कालांतराने ‘मुक्ताई -भवानी अभयारण्या’चा दर्जा प्राप्त झाला असतांना, सदर वनक्षेत्रात मानवी प्रवेश निषिद्ध असल्याने वनहद्दीत जेसीबी आढळुन आल्याने जेसीबी चा अपप्रवेश चा नेमका उद्देश काय? उत्खननाचा हेतु होता कि आणखी काही दुसरं किंवा नेमकं कारण अद्यापपर्यत स्पष्ट झाले नसल्याने, अपप्रवेशाचा गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास योग्य दिशेने केला जाणार असल्याचे समजते. याबाबत योग्य तपास करण्याचे आव्हान वनविभागापुढे आहे.

पुर्वी याच कं.नं.मधील मुरुम वाहुन नेण्यात आला होता.याप्रकरणी तत्कालीन वनरक्षकावर तत्कालीन उपवनसरंक्षक विवेक होसिंग यांनी निलंबनाची कारवाई त्यावेळी केली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!