भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

मरीमाता मंदिरातील यात्रोत्सव बारागाडे परिसरातील अतिक्रमण हटवून स्वच्छतेचा उपाय योजना कराव्या- गटनेता रंजना भारंबेचा सभागृहात मागणी

सावदा, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | सावदा नगरपालिकेकडून दि. १२ गुरवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत भाजप शिवसेना युतीच्या गटनेत्या सौ. रंजना भारंबे यांनी शहरातील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या मरीमाता यात्रा उत्सव परिसरातील अतिक्रमणासंदर्भात मुद्दाउपस्थित करत नगरपालिका प्रशासनाने कारवाई करून योग्य उपाय योजना कराव्यात अशी मागणी केली.

सावदा शहरातील मरीमाता मंदिरातील यात्रोत्सव बारागाडे शेकडो वर्षांची परंपरा आहे. मंदिराच्या गेट समोरील बाजूने ते मातंग वस्ती पर्यंत बारागाडे ओढले जातात समोरील बाजूने नाला आहे तो पूर्ण अतिक्रमण झाला आहे. पण गटारीच्या पुढे पण रस्त्याकडे अतिक्रमण म्हणजे मोठे मोठे विटांचे ठीक आहे पुढे लाकडांचे ढिग आहे यात्रेच्या वेळी खूप गर्दी असते बारागाडी पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने स्त्री पुरुष उभे राहतात या अतिक्रमणाने उभे राहायला अडचणी येतात असे वाटते की शेकडो वर्षांनी पारंपारिक यात्रा उत्सव भरायला अतिक्रमणाने जागा मिळेल की नाही.

यात्रेत बाराखडी पाहताना एक धाक असतो आतापर्यंत काही झालं नाही पण काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गटारीच्या बाहेर जे काही अतिक्रमन आहे ते हटवण्यात यावे कारवाई करावी व त्या ठिकाणी चार ते पाच दिवसांपासून नियमित स्वच्छता करावी अशा संदर्भातले मुद्दा उपस्थित करत भाजप-शिवसेना युतीच्या गटनेत्या रंजना भारंबे यांनी सभेत या संदर्भात मुद्दा उपस्थित करत सावदा शहराच्या पारंपरिक मरीमाता यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने येथे नगरपालिका प्रशासनाने योग्य उपाय योजना करण्याची मागणी नगरसेविका तथा गटनेत्या रंजना भारंबे यांनी यावेळी सभागृहात मांडत मागणी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!