संतापजनक ;कोरोना बाधित तरुणीवर सामूहिक बलात्कार
Monday To Monday NewsNetwork।
इंदौर(वृत्तसंस्था)। कोरोनाच्या महामारीत रुग्णाकडून अनेक लुटीचे प्रकार घडत आहेत,कोरोना काळात इंजेक्शन चा काळाबाजार आणि पैशांची लूट ,मयत रुग्णाच्या खिशातून पैसे काढणे,अशा अनेक घटना सतत समोर येत आहेत. मात्र, आता एक संतापजनक घटना समोर आली आहे. चोरीच्या उद्देशानं घरामध्ये घुसलेल्या तीन नराधमांनी चाकूचा धाक दाखवत तरुणीवर बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही तरुणी कोरोनाबाधित असल्यानं होम क्वारंटाईन होती. हैवानांनी कोरोना बाधित तरुणीवर सामूहिक बलात्कार करत 50 हजार रोकड आणि मोबाईलही काढून घेतला. हा प्रकार मध्यप्रदेशातील इंदौर येथील आहे.
शनिवारी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलसानी यातील दोन आरोपींना अटक केली आहे. तर, तिसरा आरोपी फरार आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी अल्पवयीन आहेत. पीडितेनं एसएसपी राजेश रघुवंशी यांना सांगितलं, की कोरोनाबाधित असल्यानं ती एकटीच घरी थांबली होती. गुरुवारी रात्री दोन वाजता तिला जाग आली तेव्हा तिच्या बेडशेजारी तीन लोक उभा होते. या चोरांनी चाकूचा धाक दाखवत तिला पैसे आणि दागिने मागितले. तरुणीनं त्यांना 50 हजार रुपये आणि दोन मोबाईल दिले. यानंतर तिघांनीही तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. मात्र, कोरोनामुळे अशक्तपणा आल्यानं ती त्यांना विरोधही करू शकली नाही. त्यांच्या हातात चाकू आणि कात्री असल्यानं हत्येच्या भितीमुळे तिनं कोणालाही आवाज दिला नाही. पीडितेनं सांगितलं, की यानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत एक आरोपी या तरुणीच्या घराबाहेरच थांबला. जेणेकरुन तिनं पोलिसांकडे जाऊ नये. सकाळ होताच आरोपीनं याठिकाणाहून पळ काढला.असंही पीडित तरुणीने संगीतल.
इंदौरच्या लसूडिया ठाणा क्षेत्रातील पंचवटी कॉलनीत राहाणाऱ्या 37 वर्षीय युवतीच्या घरी गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळी पोलिसांनी युवतीची मेडिकल टेस्ट केली. तिच्या तक्रारीनुसार तीन अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करुन घेण्यात आली.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली. यानंतर आरोपींना दोन आरोपींना ताब्यात घेतलं. दोघांनीही आपला गुन्हा मान्य केला असून ते दोघंही अल्पवयीन आहेत. यातील एकाच नाव दीपक असून तो युवतीचा शेजारीच आहे. तरुणी घरी एकटी असल्याचं पाहूनच त्यानं ही योजना आखली होती. दीपक अजूनही फरार आहे.दोन महिन्यांआधीच तो तुरुंगातून बाहेर आला असून त्याची माहिती देणाऱ्यासाठी 20 हजाराचं बक्षीस जाहीर कऱण्यात आलं आहे.