इंग्लंड मध्ये भारता बाहेर प्रथमच छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
लंडन, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भारताबाहेर ही छञपती संभाजी महाराज यांच्या ३६५ व्या जयंती चा उत्साह पाहायला मिळाला, लंडन मधील छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशन च्या वतीने भारतीय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली,
लंडन मधील डबल ट्री बाय हिल्टन हॉटेल मधील सभागृहात भारतीय विद्यार्थ्यांनी अणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन
शंभू राजांच्या मूर्तीवर दुग्ध अभिषेक करुण पूजन करून अभिवादन केले. तसेच लंडन मधील रस्त्यावरील मार्बल आर्च परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती बद्दल रॅली देखील काढली.
विशेष म्हणजे याच वर्षी याच ठिकाणी पहिल्यांदाच १९ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त या छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशन ची स्थापना करण्यात आली होती, आणि याच असोसिएशनच्या वतीने आजचा भव्य कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. या वेळी कोमल चौधरी, हृतिक खिवसारा,धिरजसिंग तौर ,आणि मित्रपरिवार उपस्थित होते.
या निमित्ताने भारतीय विद्यार्थ्यांनी इंग्लंड मध्ये दोन्ही छत्रपतींना अभिवादन करत असतांनाच, भारतीय विद्यार्थ्याच्या हितासाठी एक सामजिक चळवळ देखिल उभी केली आहे, ज्या द्वारे भारतातून इंग्लंड मध्ये शिक्षण अथवा नोकरी साठी येणाऱ्या भारतीयांसाठी हक्काचे संघटन मिळणार आहे.