हतनूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ, हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडले
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरण श्रेत्रात पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असून हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे धरणातून ८४ हजार ४७३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे तापी नदीला पूर आला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मध्य प्रदेशात आणि विदर्भातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे तापी- पूर्णा नदीला पूर आला असून, हतनूर धरण क्षेत्रात पाण्याचा स्रोत वाढला आहे . हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सोमवारी धरणाचे १८ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे.
आज दिनांक २५ आगस्ट २०२४ रोजीची हतनूर धरणाची सद्यस्थिती
पाणी पातळी – २१०.६२० मी.
एकुण पाणी साठा= २१८.८० दलघमी.
एकुण पाणी साठा टक्केवारी = ५६.३९%
विसर्ग- २३९२ क्युमेक्स (८४४७३क्युसेक्स)
दरवाज्यांची सद्य स्थिती – १८ दरवाजे पूर्ण उघडे