आंतराष्ट्रीयजळगावभुसावळमहाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यावर शोककळा ! नेपाळ मधील मृतदेह रात्री पर्यंत घरी पोहोचण्याची शक्यता

भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l काल सकाळी नेपाळमधील पोखरा व काठमांडूच्या दरम्यान बस मास्यार्गाडी नदी पात्रात पडून झालेल्या अपघातात २७ आबालवृध्दांचा मृत्यू झाला असून यातील बहुतांश भाविक हे भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव, तळवेल परिसरातील असल्याची माहिती मिळताच परिसरावर शोककळा पसरली. सकाळीच या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. तथापि, रात्री उशीरा नेपाळ शासनाने मृतांची अधिकृत आकडेवारी जारी केली. यानुसार, सदर अपघातात २७ स्त्री-पुरूषांनी प्राण गमावले आहेत. यात ड्रायव्हर व क्लीनर वगळता अन्य सर्व जण हे वरणगाव व तळवेल परिसरातील होती.

नेपाळमधील तनहुन जिल्ह्यातून निघालेली एक बस नेपाळच्या प्रमुख महामार्गावरील मर्स्यांगडी नदीत कोसळली. शुक्रवार २३ ऑगस्ट सकाळी साडे अकराच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नेपाळची राजधानी काठमांडूपासून १२० किलोमीटरवर पश्‍चिमेकडे अबुखैरेनी गावजवळ हा अपघात घडला. ही बस गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची होती. गोरखपूरच्या धर्मशाला बाजार भागात राहणारे सौरभ केसरवानी यांची पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर ही एजन्सी नोंदणीकृत आहे.

अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी नेपाळ दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याची विनंती केली होती. आता या प्रकरणी आम्ही राज्याला सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आज हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!