भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

संतापजनक : शिक्षक, शिक्षकच आहे की भक्षक? शिक्षकाने केला सहा मुलींचा लैंगिक छळ

शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना

मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात अल्पवयीन मुली, महिला यांचेवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. ठाणे जिल्ह्यात बदलापूर मध्ये शाळेत दोन साडेतीन वर्षीय बलिकांची लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच ठाण्यातीलच कळवा येथे गतिमंद अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. आणि आता लागलीच एक शिक्षिकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने एक नव्हे तर तब्बल सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक तेव्हढीच संतापजनक घटना समोर आलीय. या घटनेनं मोठी खळबळ उडाली असून, ” शिक्षक, शिक्षकच आहे की भक्षक? ” असा सवाल या वेळी उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अकोला जिल्ह्यातील काजिखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील असून प्रमोद सरदार असं या शिक्षकाचे नाव आहे. हा शिक्षक इयत्ता आठवितील विद्यार्थिनींशी आधी अश्लील गप्पा मारायचा, त्या नंतर त्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवायचा, व त्यांना वाईट हेतूने त्यांच्या शरीराशी स्पर्श करायचा. अखेर विद्यार्थिनींनी सदर चा प्रकार पालकांना सांगितल्यावर असे या विकृत शिक्षकाने जवळपास सहा विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचे उघडकीस आले. पालकांनी या बाबत पोलिसांकडे तक्रार केली असता उरण पोलिसांनी प्रमोद सरदार या शिक्षकाला लागलीच अटक केली. पोलिसांनी पिडीत सहा विद्यार्थिनींचा जबाब नोंदवून घेत गुन्हा दाखल केला. या शिक्षकावर पॉस्कोसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून शिक्षक प्रमोद सरदार हा सध्या उरण पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस या आरोपी शिक्षकाला आज दिनांक २१ आगस्ट बुधवार रोजी पुढील कारवाई करीत न्यायालयात हजर करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!