भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

पाकिस्तानशी युद्ध झालं तरी व्हिडीओवर बोलतो म्हणतील, राणेंचें मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत भाजपाचं हिंदुत्व नकली असल्याचा आरोप केला होता. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव असल्याची टीका शिवसेना अपयश आलं की म्हणायला सुरुवात करतात. अडीच वर्ष मुंबई तोडण्याचा डाव आणि हिंदुत्व आठवलं नाही. असा पलटवार करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.

शरद पवार यांनी हिंदुत्ववादी पक्षासोबत राहिलो तर पक्ष फुटेल असं म्हणाले होतं. बाळासाहेब ठाकरे एक शब्द दिला तर ते कायम राहायचे. १९९९ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी नेता आपल्या कार्यकर्त्यासाठी काय करु शकतो हे दाखवून दिलं आहे. मी कुणाच्याही मंत्रिमंडळात मंत्री म्हणून राहणार नाही, असं बाळासाहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी आपण विरोधी पक्षात बसणार असल्याचं सांगितलं, असं नारायण राणे म्हणाले.

भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेनेचे निवडून आलेले आमदार खासदार ही मोदीकृपा आहे. त्यांचे ८च्या पुढं खासदार जात नव्हते. आमदारही १५ च्या पुढे जात नव्हते. आता असलेले ५६ ते देखील पडतील, असं नारायण राणे म्हणाले. आम्ही सडेतोड बोलतो, खरं बोलतो, बोगस माहिती देत नाही, असं राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंचं परवाचं भाषण बोगस होतं. पाकिस्तानशी लढाई झाली आणि यांना बघायला सांगितलं तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलतो म्हणतील, अशी टीका राणेंनी केली. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करु नये. बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे असूनही मला मुख्यमंत्री केलं. तुम्ही १० वर्ष मुख्यमंत्री राहिलात तरी माझ्या ८ महिन्यांच्या कामाची बरोबरी करु शकणार नाही. शिवसंपर्क अभियान नव्हतं तर शिव्या संपर्क अभियान आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!