फैजपुरात उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई, अवैद्य मद्यसाठा जप्त !
फैजपुर (प्रतिनिधी)। महाराष्ट्र राज्यासह जळगांव जिल्ह्यात मध्यप्रदेश निर्मित तसेच बनावट दारूची विक्री अनेक ठिकाणी सर्रास विक्री केली जात असल्याचे समजते त्या धर्तीवर आज दि.२९ जुलै बुधवार रोजी राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागाचे निरीक्षक ई.ना.वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून फैजपुर ता.यावल येथील श्रीराम टॉकीज जवळ एका बंद खोलीत बेकायदा मद्यसाठा असल्याचे समजल्याने तेथे पथकासह छापा टाकला धडक कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे अवैद्य मद्यमाफियांन मध्ये खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मुबंई , विभागीय उपायुक्त अ.ना.ओहोळ नाशिक,जळगावचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.२९ जुलै बुधवार रोजी राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागाचे निरीक्षक ई.ना.वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून फैजपुर ता.यावल येथील श्रीराम टॉकीज जवळ एका बंद खोलीत बेकायदा मद्यसाठा असल्याचे समजल्याने तेथे पथकासह छापा टाकला असता ८७ हजार ३६०रु. देशीदारु टॅगोपंच १८० मिलीच्या एकूण १ हजार ६८० बाटल्या एकूण ३५ बॉक्स,२ हजार ४९६ रु.किमतीची देशीदारू बॉबी संत्रा १८० मिलीच्या एकूण ४८ बाटल्या एकूण १ बॉक्स,१ हजार २५०रु.मॅकडॉल्स व्हीस्की १८० मिलीच्या एकूण ७ बाटल्या,५ हजार ५२५ रु.किमतीच्या रॉयल नाईट मॉल्ट व्हीस्की ७५० मिलीच्या एकूण १३ बाटल्या ही सर्व दारू मध्यप्रदेश निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्री बाळगणेसाठी प्रतिबंधीत असलेली,५ हजार ९५० -रु.किमतीच्या एका पाण्याच्या प्लॅस्टिक जार मध्ये अंदाजे १० लिटर तयार बनावट विदेशी दारू भरलेले,५०:एफ रॉयल नाईट मॉल्ट व्हीस्की ७५० मिलीच्या एकूण ७ खाली दारू बाटल्या मध्यप्रदेश निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्री-बाळगणेसाठी प्रतिबंधीत असलेल्या,५ हजार रु.किमतीचा एक मोबाईल असा एकूण १ लाख ७ हजार ४३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी विक्की प्रकाश अठवाणी रा.फैजपुर ता.यावल यास मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ कलमान्वये गुन्हा नोंद करुन त्यास अटक करण्यात आली आहे . सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क भुसावळचे निरीक्षक ई. ना.वाघ,नाशिक येथील विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक श्री. फुलझळके,निरीक्षक रा.उ.शु.पुरनाड ता.मुक्ताईनगर श्री जाखैरे,दुय्यम निरीक्षक यावल के.एन.बुवा,दुय्यम निरीक्षक के. बी.मुळे व आदी सहकारी हे सहभागी होते. सदर गुन्ह्याचा पुढील तपास भुसावळ विभागाचे निरीक्षक ई.ना.वाघ हे करीत आहे. रावेर यावल तालुक्यातील काही दारूचे दुकाने काही हॉटेली व इतर ठिकाणी अशीच मध्यप्रदेश निर्मित व बनावट दारूची विक्री केली जात असल्याचे वृत्त आहे. या बाबत संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून जोर धरीत आहे.