भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्ररावेर

वेळ वाढवा : वाढत्या उष्णतेचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम, मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदानाची वेळ वाढवा

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान संपले. प्रचाराची धामधूम सुरू असताना वाढत्या उष्णता मानाच्या मानाने लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात देखील गरमागरमी वाढलेली असताना दिसत आहे. वाढत्या तापमाना मुळे देशात मतदान अगदीच कमी टक्केवारी ने होत आहे. दरम्यान प्रशासन व निवडणूक आयोगा कडून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे यासाठी विविध उपायोजना केल्या जात असून सोबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती देखील केली जात आहे यावार करोडो रुपयांचा शासन खर्च करीत आहे.परंतु देशात झालेल्या मतदानाच्या कामी टक्केवारी वरून मतदान वाढीचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही.या साठी मतदानाची वेळ एक तासाने वाढवावी अशी मागणी केली जात आहे.

वाढत्या उन्हामुळे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ रावेर व जळगाव येथे किती टक्के मतदान होते हे दिनांक १३ रोजी समजेल पण येथील उन्हाळ्यातील तापमान लक्षात घेता मतदानची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता असून असे झाल्यास प्रशासनाने मतदान वाढीसाठी केलेले प्रयत्न वाया जाणार आहेत इतकेच नव्हे तर त्यासाठी खर्च करण्यात आलेले करोडो रुपये मात्र पाण्यात जाणार आहेत. या करीता मतदानाची टक्केवारी वाढावी या करीता मे महिन्याचे उष्णतामान लक्षात घेता मतदानाची वेळ एक तासाने वाढवावी सकाळी ७ वाजे पासून तर संध्याकाळी ६ वाजे पर्यंत असलेली वेळ सकाळी ७ वाजे पासून ते संध्याकाळी ७ वाजे पर्यंत करावी अशी मागणी सुज्ञ मतदारातून होताना दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्यात तापमान नेहमी ४५ डिग्री चे आसपास किंबहुना ४५ डिग्री पेक्षाही जास्त राहात असते यामुळे नागरिक या काळात दुपारी ११ वाजेपासून ते सायंकाळी चार ते पाच वाजेच्या वेळेत घरातच राहणे पसंत करतात इतकचं नाही तर शासन सुद्धा अतिरिक्त उन्हामुळे दुपारच्या वेळेस घराच्या बाहेर पडू नका असे जनतेस आवाहन करीत असते.

दरम्यान ही सर्व परस्थिती बघता मतदानाच्या दिवशी उष्णतेचा परिणाम मतदानावर होऊ नये यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढावी या करीता सदरची बाब लक्षात घेता मतदान वेळेत संध्याकाळी एका तासाने वाढ करावी अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच निवडणूक आयोग यांचे कडे सुज्ञ मतदारांकडून केली जात असून उष्णतेचे तापमान पाहता व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवून मागणी करावी अशी सुज्ञ मतदारांकडून मागणी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!