भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

एक लाखांची खंडणी, पिता – पूत्रावर गुन्हा दाखल

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दुग्ध व्यावसायिक प्रल्हाद बळीराम पाटील यांच्या कडून घेतलेल्या दुधाची साय प्लास्टिक सारखी दिसते. एक लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा याचा व्हिडिओ तयार करून व्हायरल करू. अशी धमकी देत पैशांची मागणी करत शेवटी तडजोडी अंती ७५ हजारांची रक्कम घेतल्या प्रकरणी पितापुत्रांवर चोपडा पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की. चोपडा शहरातील निर्मल डेअरीवरून ऋषी संजय पाटील हे दूध घेऊन गेले. तेव्हापासून १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान डेअरीचे प्रल्हाद बळीराम पाटील . वय-५५ वर्ष. धंदा व्यवसाय रा. प्लॉट नं १०८ गणेश कॉलनी चोपडा यांना वारंवार ऋषी संजय पाटील यांनी फोन करुन सांगीतले की, मी तुमच्या दुध डेअरी वरुन दुध घेवुन गेलो असुन त्याला तापवले असता त्याची साय ही प्लॅस्टीक सारखी आहे. असे सांगुन तसा त्या तापवलेल्या दुधाचा व्हीडीओ तयार करुन तो व्हीडीओ प्रल्हाद पाटील यांना पाठवुन तो दुधाचा व्हीडीओ इतरत्र सर्व दूर व्हायरल करु अशी धमकी दिली.

तुम्हाला तुमची बदनामी होवु द्यायची नसेल तर आम्हांस १ लाख रूपये द्यावे लागतील असे सांगून ७५ हजार रूपये घेतले. याप्रकरणी प्रल्हाद पाटील यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार संजय विक्रम पाटील व ऋषी संजय पाटील दोन्ही रा. बिडगाव, ता. चोपडा ह.मु. सानेगुरुजी कॉलनी चोपडा ता. चोपडा यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे मारगदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र अशोक वल्टे हे करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!