भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

Facebook Instagram Down: जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम अचानक होत आहेत लॉगआऊट!

नवी दिल्ली, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क| जगभरात फेसबुक आपोआप लॉगऑऊट झाले आहेत. संपूर्ण फेसबुक डाऊन आहे. याबाबत अजून कोणतीही अपडेट आली नाही. इंस्टाग्राम देखील डाऊन असल्याची माहिती मिळत आहे. वापरकर्त्यांच्या मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज आले त्यानंतर फेसबुक अकाऊंट लॉगऑऊट झाले आहेत.

पुन्हा लॉगइन केल्यानंतर पासवर्ड नाकारल्या जात आहे. परंतु आपला पासवर्ड चुकीचा नाही. फेसबुकच्या होम पेजवर जाण्याऐवजी Facebook तुम्हाला आपोआप बाहेर काढेल.

तुमचा लॉग इन कालबाह्य झाला आहे असा एरर मेसेज दिसेल आणि तुम्ही परत लॉग इन करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची क्रेडेन्शियल्स नाकारली जातील. (Facebook, Instagram And Other Meta Apps Are Down, Users Being Logged Out)

लॉगआऊट होण्याचा प्रकार इंस्टाग्राम तसेच मेसेंजरवरही होत आहे. मात्र तुमचा पासवर्ड बदलण्याची गरज नाही. सध्या फक्त सेवा खंडीत आहेत. फेसबुक यावर अधिकृत उत्तर देणार आहे.

नेमकी काय अडचण येत आहे –

फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड्ससह मेटा-मालकीचे प्लॅटफॉर्म सध्या तांत्रिक समस्यांना तोंड देत आहेत. वापरकर्ते विविध समस्यांची तक्रार करत आहेत, जसे की त्यांच्या Facebook खात्यातून लॉगआउट झाल्यानंतर, परत लॉगइन होत नाही आहे. त्याचप्रमाणे, Instagram वापरकर्त्यांना त्यांचे फीड रिफ्रेश करण्यात अडचणी येत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!