विधानसभेत फडणवीसांचा नवा ऑडिओ पेनड्राईव्ह बॉम्ब; दाऊदच्या नातेवाईकाला घेतलं वक्फ बोर्डावर !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवा पेनड्राईव्ह बॉम्ब सादर केला. यात एक ऑडिओ असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. यातील डॉ. मुद्दस्सिर लांबे (Dr. Muddasir Lambe) यांचे संबंध दाऊदशी असून डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान (Arshad Khan) यांच्यातील संभाषणाचा हा ऑडिओ असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ लांबे यांना राज्य सरकारने वक्फ बोर्ड वरती घेतले आहे. मात्र एका सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे, असंही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी नवीन आरोप केले आहेत. ज्यामध्ये 2 नवीन पात्र आहेत. एक मो. अर्शद खान आणि दुसरे डॉ. मुद्दस्सिर लांबे. नेमके काय संभाषण आहे ऑडिओ क्लिपमध्ये (मराठीत रूपांतर)
संवाद: सलामवालेकूम
डॉ. लांबे : माझी समस्या काय आहे माहित आहे का? माझा सासरा पूर्वी दाऊदचा उजवा हात होता. माझ्या बाजूने सोहेल भाई आणि हसीना आपा होती. हसीना आपा म्हणजे दाऊदची बहीण. हसीना आपा आणि सोबत इक्बाल कासकरची पत्नी. म्हणजे दाऊदची मेहुणी. काहीही झाले तरी प्रकरण यांच्यापर्यंत पोहोचते.
अर्शद खान : तुम्ही त्याच्यासोबत अन्वरचे नाव ऐकले असेल. तो माझा मामा आहे. तोही त्यांच्यासोबत राहत होता. म्हणजे सुरुवातीपासून त्यांच्यासोबतच होते. आता त्यांचे नुकतेच निधन झाले.
डॉ. लांबे : माझे सासरे संपूर्ण कोकण पट्टा सांभाळत होते, त्यांच्याकडे ब्लॅक बेल्ट होता आणि ते संपूर्ण कोकण पट्टा सांभाळायचे.
अर्शद खान : ठीक आहे. माझे एक काका मुंबईला होते आणि ते सर्व सांभाळायचे. जेव्हा मी मदनपुरात होतो. माझा जन्म भेंडी बाजारात झाला आहे.
डॉ. लांबे : माझ्या घरात काही समस्या असेल तर ती तिथे पोहोचते. साधी चर्चा सोहेल भाईपर्यंत पोहोचते. चार दिवसांपासून माझ्या घरात हा वाद सुरू आहे.
अर्शद खान: म्हणूनच मी विचारलं तुझी स्टोरी काय आहे, मग मी काहीच बोललो नाही, मला स्वतःचं टेन्शन आहे.
डॉ. लांबे : अर्शद, मी तर म्हणतो की तू आता वक्फचे काम पकड. तुमच्याकडे आता सत्ता आहे. आता तुम्हाला हवे तितके पैसे तुम्ही कमवू शकता. संपूर्ण वक्फचे काम सुरू करा. कमाई सेट करा. अर्धा हिस्सा तुझा आणि अर्धा हिस्सा माझा
अर्शद खान: आता मी बसेन आणि या सर्व गोष्टींमध्ये मी वैयक्तिकरित्या तुमच्याबरोबर बसेन. मी माझ्या एका मित्राला घेऊन येईन आणि मी कामाला लागेन.
डॉ. लांबे : आमच्या माहिम मध्ये काय व्हायचे माहित आहे का? मला काही झाले तर सगळे लोक एकत्र यायचे.
अर्शद खान : अर्शदच्या नावावर इमारत घ्या. अर्शद माझा विश्वासू माणूस आहे. पलटी मारणार नाही.
डॉ. लांबे : चौकशी तुमच्यावर बसू शकते, पण ती माझ्यावर बसू शकत नाही.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा