आपल्या यशामागे आपल्या आई वडिलांचा त्याग,मेहनत,संघर्ष,त्या त्यागाची,संघर्षाची,आपण किंमत करा.परंतु यश पचविणे कठीण – जनार्दन हरीजी महाराज
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आयुष्यामध्ये अपयश पचवणे सोपे आहे परंतु,यश पचवणे कठीण आहे आणि ज्यांना यश पचवता आलं ते खुप यशस्वी झाले आहेत हे दिसून येते . आजकाल आपल्या विद्यार्थ्यांचे थोडे जरी कौतुक झाले की त्यांचे पाय जमिनीवर राहत नाही आणि तिथूनच आपली उन्नती संपायला सुरुवात होते. महाराष्ट्राची चित्रपट सृष्टी ही देशभरात आदर्शवत आहे. त्याचं ताजं उदाहरण जर बघायचं झालं तर किशोरी शहाणे आणि भारत गणेशपुरे यांच्यासारखे कलाकार आपली संस्कृती टिकून ठेवून आहेत. आपल्या मराठी चित्रपट सृष्टी कडून पुढच्या पिढीने आदर्श घ्यावा अशीच आपले कलाकार आहेत. आपल्या यशामागे आपल्या आई वडिलांचा त्याग,मेहनत, संघर्ष आहे. त्या त्यागाची ,संघर्षाची ,मेहनतीची आपण किंमत केली पाहिजे. असे मत जनार्दन हरीजी महाराज यांनी योगराज फाउंडेशन मुक्ताईनगर, यांचे वतीने सावदा येथे आयोजित गौरव गुणवंतांचा या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, अभिनेत्री किशोरी शहाणे, हास्य कलाकार भारत गणेशपुरे, सुरेशराज शास्त्री,योगराज फाउंडेशनचे विनोद सोनवणे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे.के. पाटील, प्रमोद सोनवणे आदी उपस्थित होते.
तर किशोरी शहाणे म्हणाल्या विद्यार्थ्यांनो आपल्यामध्ये आत्मविश्वास खूप गरजेचा आहे. सामाजिक माध्यमांवर आपला वेळ न दवडता आपल्या भविष्याच्या वाटचालीसाठी आपण प्रयत्नशील पाहिजे. त्यासाठी येणारी प्रत्येक वेळ ही महत्त्वाची आहे. आपण आपली स्पर्धा इतरांशी न करता स्वतःशीच करावी. भारत गणेशपुरे यांनी वऱ्हाडी भाषेतून मार्गदर्शन करतांना कार्यक्रमाला हास्याची फोडणीही दिली.
सुरेश राज शास्त्री यांनीही विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे सोबतच सावदा शहरासह परिसरातील पत्रकारांचाही शाल सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक विनोद सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन प्रशांत पाटील सर यांनी केले.