यावल तालुक्यातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर,ता. यावल,मंडे टू मंडेवृत्तसेवा । यावल तालुक्यातील एका गावातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला एका अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेली असल्याचा प्रकार घडला.
या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात मावशी कडे राहात असलेली सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी १७ जानेवारी सोमवार रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान शिवण क्लासला जाते असे सांगून गेली असता रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली असता ती कोठेच मिळून आली नाही.शेवटी मुलीच्या वडीलांनी पोलिसस्टेशनला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिल्याने मंगळवारी १८ जानेवारी रोजी अज्ञात व्यक्तीविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.