फैजपूर नगरपालिका कार्यालयावरील गच्चीच्या साफसफाईचे काम न करता बिल सादर ?
Monday To Monday NewsNetwork।
फैजपूर (प्रतिनिधी)। यावल तालुक्यातील फैजपूर नगरपरिषदेच्या मुख्य कार्यालयावरती गच्चीवर साफसफाईच्या नावाखाली बिल सादर केले असल्याचे वृत्त आहे. येथील प्रत्येक शॉपिंग कॉम्प्लेक्स वरील रेन वॉटर हार्वेस्टिंग द्वारे पावसाचे पाणी साचू नये म्हणून ही सरकारी सुविधा केली जाते. परंतु शहराचा विकास तर सोडाच येथील नगर परिषद मुख्य कार्यालयावरती गच्चीवर ते पाणी झिरत आहे .नगरपरिषदेच्या मुख्य कार्यालयावरील गच्चीवर पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे साठी उपयोग केला जातो, शहरातील सर्वच शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या गच्चीवर पाणी साचू नये म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग वापरण्यासाठी शासनातर्फे हजारो रुपये खर्च केला जातो परंतु शहराचा विकास तर सोडाच तर स्वतः नगरपरिषदेच्या गच्चीवर पाणी साचत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली आहे स्वतः नगरपरिषद कार्यालय वरच्या गच्चीचे काम न करता केवळ कागदपत्रांवर बिल सादर केले असल्याची माहितीमुळे शहरात एकच चर्चेचा विषय बनला आहे.
फैजपूर शहरात किती विकास कामे झाली, किती पारदर्शक झाली आणि किती कागदपत्रांवर झाली याची सुद्धा चौकशी करणे गरजेचे झाले असल्याची चर्चा शहरभर सुरू झाली असल्याचे बोलले जात आहे,मुख्य नगरपरिषद कार्यालयावरील गच्चीचा ठेका कोणाच्या नावावर दिला होता आणि गच्ची स्वच्छ न करता बिल सादर केले असल्याचे बोलले जात असून या बाबत एकच चर्चा सुरू असून चौकशी करावी अशी मागणी होत आहे