भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

धनजी रेस्टॉरन्टच्या शटरचे कुलूप तोडून २५ हजाराची रोकड लंपास

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपूर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। शहरातील रहदारीचा महत्वाचा परिसर असलेल्या सुभाष चौकातील धनजी रेस्टॉरन्ट दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून २५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली असून याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी, फैजपूर तालुका यावल येथील भरत डिगंबर चौधरी (वय-३५) रा. गणेश कॉलनी यांचे फैजपूर शहरातील सुभाष चौकातील धनजी रेस्टॉरन्ट नावाचे दुकान असून नेहमीप्रमाणे १ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजता दुकान बंद करून भरत चौधरी घरी निघून गेले. २ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातून २५ हजार रूपयांची रोकड चोरून लंपास केली. चोरी झाल्याचा प्रकार सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दुधवाल्याच्या लक्षात आल्याने घडलेल्या प्रकारची फैजपूर पोलीसांना माहिती दिल्याने रेस्टॉरंट मालक भरत चौधरी यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!