भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलशैक्षणिक

धनाजी नाना महाविद्यालयात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपूर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। येथील धनाजी नाना महाविद्यालयात आज १५ आक्टो. रोजी माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने ‘वाचन प्रेरणा दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, विद्यार्थी कल्याण मंडळ व ग्रंथालय विभागातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. उदय जगताप होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भुसावळ येथील कोटेचा महिला महाविद्यालयातील राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. शुभांगी राठी यांनी वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने वाचनाचे महत्व विशद करून वाचनाचे जीवनातील स्थान, जीवनाला येणारी परिपक्वता, विचारांची समृद्धता विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले व जीवनात यशस्वी व्हायचे असेल वाचनाशिवाय तरणोपाय नाही. ‘वाचाल तर वाचाल’ ही गुरुकिल्ली विद्यार्थ्यांना दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो प्रमुख डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी केले त्यात त्यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली व विद्यार्थ्यांना पुस्तके, माणसे व निसर्ग वाचनासाठी आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जगताप यांनी कलाम साहेबांनी प्रत्यक्ष कृतीने विविधम मापदंड निर्माण केले. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा असंख्य भारतीयांना भुरळ घातली. त्यांचे जीवन अतिशय प्रेरणादायी असून विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेले प्रयोग नंतरच्या अनेक शास्त्रज्ञांना प्रेरणादायी आहेत. म्हणून ते नेहमी वंदनीय व तरुणांचे आदर्श राहतील असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सरला तडवी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. गोपाल कोल्हे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या आयोजनात एनसीसी प्रमुख लेफ्टनंट राजेंद्र राजपूत, ग्रंथपाल प्रा. इरबा गायकवाड , सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा. शेरसिंग पाडवी यांचे अनमोल सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सन्माननीय प्राचार्य उपप्राचार्य व एन एस एस,एन सी सी, विद्यार्थी कल्याण मंडळाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!