म्हैसवाडी येथे विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर ,ता.यावल.मंडे टू मंडे वृत्तसेवा। यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथे एका विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील फैजपूर पोलिसस्टेशन हद्दीत म्हैसवाडी येथील ३० वर्षीय विवाहिता पती व कुटुंबियांसह वास्तव्याला असता दि.१३ नोव्हेंबर रोजी विवाहिता आपल्या राहत्या घरी एकटी असतांना गावातीलच समाधान नारायण कोळी हा तरूण त्यांच्या घराच्या जिन्याजवळ येऊन संशयित आरोपीने विवाहितेचा हात पकडून शरीरसुखाची मागणी केली. सदर महिलेने याला नकार दिल्याने, तुझ्या मुलांसह तुला जीवे ठार मारेल अशी धमकी देऊन अश्लिल शिवीगाळ केली. याप्रकरणी विवाहितेने फैजपूर पोलीसात तक्रार दिल्याने विवाहितेच्या तक्रारीवरून १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता फैजपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी समाधान नारायण कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.