भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलराजकीय

फैजपूर नगरपरिषद निवडणुकीत आर्थिक उलथापालथ – माघारीच्या दिवशी तब्बल ३ कोटींची उलाढाल ? चर्चेला उधाण, ५ उमेदवार बिनविरोध !

फैजपूर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क चमू | फैजपूर शहरात नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना माघारीच्या दिवशी मोठा राजकीय भूचाल जाणवला. उमेदवारी माघारीसाठी झालेल्या हालचालींमध्ये तब्बल तीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची जोरदार चर्चा शहरभर रंगली आहे. राजकीय सौदेबाजी, गुप्त वाटाघाटी आणि शेवटच्या क्षणी झालेले व्यवहार यामुळे संपूर्ण शहरात एकच विषय चर्चेत राहिला.

या सर्व गदारोळात पाच उमेदवार बिनविरोध निवडून येण्यात यशस्वी झाले, ज्यामुळे त्यांच्या पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण असून समर्थकांमध्ये जल्लोष सुरू आहे. विरोधक मात्र या बिनविरोध निवडणुकीमागील गोष्टींबाबत संशय व्यक्त करत आहेत.

दरम्यान, नागरिकांमध्येही या उलाढाली विषयी भिन्न प्रतिक्रिया दिसून आल्या. काहीजणांनी “लोकशाही प्रक्रियेचा अपमान” असे मत व्यक्त केले तर काहींनी याला “फैजपूर राजकारणाचा नवा ट्रेंड” म्हणून हेटाळणी केली.

फैजपूर नगरपरिषदेची निवडणूक दिवसेंदिवस अधिक नाट्यमय होत असून, माघारीच्या दिवशी घडलेल्या या आर्थिक घडामोडींनी संपूर्ण राजकीय समीकरणेच बदलून टाकली आहेत. आगामी मतदाना दिवशी आणखी कोणते राजकीय कलाटणी समोर येतील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून मतदानावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणावर लक्ष्मीदर्शन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!